पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी तरी हे सुदधा वाचुन बघा
पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी हे पण वाचुन बघा पुस्तके तर आज सगळेच वाचतात फरक एवढाच आहे कोणी आज आँनलाईन वाचते आहे तर कोणी आँफलाईन वाचते आहे पण वाचन तर सगळेच करतात. पण खरच तुम्हाला वाचायची मनापासुन आवड आहे ना तर अणि खरच तुम्हाला मनापासुन वाचायचेच आहे तर माणसांची डोळेही वाचुन बघा त्या डोळयांमध्ये लपलेले अश्रुही कधी तरी वाचुन बघा त्या अश्रुंमध्ये दडलेला खरेपणा खोटेपणा वाचुन बघा. कधी तरी गोरगरिबांचे डोळेही वाचुन बघा त्या डोळयांमध्ये दडलेले अश्रु,दुखही वाचुन बघा त्या दुखामध्ये दडलेल्या त्यांच्या वेदना,तळमळ, कळकळ वाचुन बघा भुकेलेल्यांच्या डोळयांमध्ये एकावेळचे अन्न मिळविण्यासाठी जी तळमळ असते कळकळ असते ना ती तळमळ ती कळकळ कधीतरी वाचुन बघा. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुला मुलींच्या डोळयातील एकटेपणाचे,अनाथ असण्याचे दुखही कधी वाचुन बघा. आईवडिलांच्या मायेसाठी,प्रेमासाठी त्या अनाथांचा जो जीव तळमळतो तडफडतो कधी तोही तर वाचुन बघा. शोषित,पीडीत,दलित,दीनदुबळयांचे डोळयातील दुखही कधी वाचुन बघा माणुस असुनही समाजाकडुन अमानवी वागणुक मिळालेल्या त्या दीन दलितांच्या डोळय...