आपल्या मनातील दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून देणे फार गरजेचे आहे.

आपण आपल्या दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून देणे फार गरजेचे आहे.
      मला एकदा माझ्या एका मित्राने विचारले की तु इतके छान लेख लिहितो एक चांगला लेखक तुझ्यामध्ये दडलेला आहे.स्वभावाने पण तु खुप समजुतदार आहेस अणि कधी कोणाशी भांडत पण नाही किंवा कोणामध्ये जास्त मिसळत पण नाही.आपल्या कामाशी काम ठेवणारा व्यक्ती तू जास्तीत जास्त अभ्यासातच स्वताचा वेळ घालवतो पण मला तुझी एक गोष्ट कळत नाही तु तुझ्या मनातील सर्व भावना राग,आनंद,प्रेम तु तुझ्या व्हाँटस अप स्टेटसला तसेच आपल्या व्हाँटस अँप गटावर बिनधास्त टाकतो तुला समोरच्या व्यक्तीला तुझे स्टेटस पाहुन वाईट वाटेल हे कळत नाही का अणि तुला जर हे कळत तर मग तु जाणूनबुजून असे का करतो?
    माझ्या मित्राप्रमाणे खूप जणांना माझ्या विषयी हा प्रश्न निर्माण होत असेल की हा असे का करतो? पण ज्यांच्या मनात माझ्याविषयी हा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा होत असेल त्यांना मी एकच सांगु इच्छितो की मनातील राग मनात दाबुन ठेवल्याने माणुस मनातच दुखी होत राहतो.आणि स्वताला त्रास करून घेत असतो. अणि मनातील राग मनात दाबुन ठेवल्याने खुप मोठी मानसिक विकृतीही निर्माण होते जी पुढे जाऊन वैमनस्याचे रूप धारण करते कारण आपल्या मनातील राग आपण जितका जास्त दाबत असतो तितकेच जास्त त्याचे दुष्परिणाम पुढे भविष्यात आपल्याला पाहायला मिळत असतात.
     व मनातील रागाला योग्य वेळी व्यक्त न केल्यामुळे वैमनस्यातून माणसाच्या हातुन भविष्यात काहीही वाईट कृत्य घडू शकते जसे की भविष्यात एकमेकांचा सूड घेणे,बदला घेणे अणि बदल्याच्या भावनेतून एकमेकांचा जीव घेणे असे अनेक अनुचित प्रकार घडतात केवळ एका मनातील रागामुळे हे सर्व घडत असते.म्हणून मी माझ्या मनात कोणाविषयी राग निर्माण झाला का मी त्या व्यक्तीला एकतर सरळ तोंडावर बोलुन टाकतो किंवा माझ्या स्टेटसदवारे,लिखाणातुन तो राग व्यक्त करतो हे केल्याने दोन फायदे होतात जसे की मला ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्या व्यक्तीलाही कळते की मी तिच्यावर,त्याच्यावर रागावलो आहे.आणि माझा रागही स्टेटस द्वारे व्यक्त होऊन जातो म्हणजेच समोरच्या व्यक्तीला त्याची चुकही कळते अणि माझा रागही स्टेटसदवारे व्यक्त झाल्याने शांत होऊन जातो आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंदाने माझ्या रोजच्या स्वभावात वागायला लागतो याच्याने माझ्या मनात कोणाविषयी वैरभाव पुर्व वैमनस्याची भावना पण राहत नाही आणि मला माझ्या आयुष्यात आनंदाने जगता येते आणि माझ्यामुळे कोणाला त्रास होत नाही व कोणामुळे मला ही त्रास होत नाही.
     म्हणुन सांगतो तुमच्या मनात दडलेल्या रागामुळे भविष्यात काही अनर्थ घडु नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या भावनांना योग्य त्या वेळी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करा अणि आपल्या मनात दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी मोकळी करून दया.अणि अणि मनातील भावना मनातच दाबुन ठेवल्याने भविष्यात तुम्हाला ज्या मानसिक विकृतींना बळी पडावे लागते त्याला टाळा.यासाठी आपल्या मनातील दडलेल्या भावनांना मग ती कोणतीही असो प्रेमाची असो किंवा रागाची असो तसेच आनंदाची असो तिला वेळीच व्यक्त होण्यासाठी  मोकळी करून देणे फार गरजेचे आहे.नाहीतर भविष्यात आपल्याला त्याची विकृती निर्माण करणारया दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते.म्हणुन वेळ असताच आपल्या मनातील दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून देणे कधीही चांगले अणि ते खुप गरजेचेही झाले आहे.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.