प्रसारमाध्यमे म्हणजे काय?
प्रसारमाध्यमे म्हणजे काय?
प्रसार माध्यमे याची व्याख्या काय?प्रसारमाध्यमे म्हणजे काय?प्रसारमाध्यमे कशाला म्हणतात?हे समजुन घेण्यासाठी आपल्याला खुप काही माहिती मिळवण्याची किंवा त्याविषयी वाचन करण्याची अजिबात आवश्यकता नाही.कारण प्रसारमाध्यमे हया नावातच त्याची व्याख्या अणि त्याचा अर्थ दडलेला आपणास दिसुन येतो.फक्त थोडया चिकित्सक दृष्टीने त्याकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे.
ते असे की प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो.अणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात.जसे की मी रोज लिहितो अणि माझ्या लिहिलेल्या लेखांमधुन मी तुम्हा सर्वांसमोर व्यक्त होत असतो.माझ्या भावना,विचार,माझ्या मनातील राग,वेदना,तळमळ इत्यादी सर्व काही मी माझ्या शब्दांमधुन तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करत असतो.म्हणजेच लिहिणे हे माझे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.त्यादवारे मी तुम्हा सर्वांसमोर माझे विचार,भावना,तगमग,तळमळ,वेदना मी मांडत असतो.म्हणजेच लिहिणे हे माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माझे माध्यम आहे असे आपणास या सर्वातुन स्पष्टपणे दिसुन येते.
म्हणजेच मी माझ्या लिहिण्यातुन शब्दांदवारे माझ्या भावना व्यक्त करतो अणि ते शब्द जे मी तुम्हा सर्वासमोर मांडतो ते माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माध्यम ठरते.
त्याचबरोबर आपण आपल्या दैनंदिन जीवणात आपल्या भावना,विचार,मनाची काहीली व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळया माध्यमांचाही आधार घेत असतो ते ही आपण स्वताला व्यक्त करण्यासाठी वापरत असलेलो एक माध्यमच असते.जसे की आपण निराश असलो तर आपण आपली निराशा व्यक्त करण्यासाठी आपण व्हाँटस अँप वर स्टेटसचा आधार घेतो.उदा: आपण निराश असल्यास निराशाजनक नैराश्यवादी स्टेटस टाकतो किंवा आनंदी असल्यास आनंद व्यक्त करणारे स्टेटस टाकतो तसेच रागात असल्यास राग व्यक्त करणारे स्टेटस टाकतो.ही सर्व आपली व्यक्त होण्याची माध्यमेच असतात.ज्या आधारे आपण समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त होत असतो.आपल्या भावना,वेदना,राग,तळमळ,विचार इत्यादी समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करत असतो.अशाप्रकारे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळया माध्यमांच्या आधारे आपल्या भावना व्यक्त करत असतो.
जसे की मी माझे स्वताचे उदाहरण देऊन सांगतो की मला माझ्या मनातील राग दाबुन ठेवायला अजिबात आवडत नाही अणि मला ते जमतही नाही.म्हणुन मी माझ्या मनात जे आले ते शब्दांदवारे मांडुन मोकळा होता.मग मी माझ्या मनात जे चालू असेल ते सर्व काही लिहुन मोकळा होतो.इतरांना माझ्या अशा वागण्याचा रागही येत असेल की हा वेडयासारखा गटावर स्वताच्या मनात जे असेल ते लिहुन टाकतो.पण त्यात मी तरी काय करु शकतो.जोपर्यत मी माझ्या मनातील भावना,विचार,वेदना,राग,तळमळ माझ्या शब्दांना सांगत नाही तोपर्यत मला चैनच पटत नाही.अणि मी स्वस्थही बसत नाही.म्हणुन माझ्या मनात जे चालु असेल मी ते लिहून मोकळा होतो.मग तो कोणाविषयीचा राग असो किंवा कोणाविषयीचे प्रेम असो किंवा इतर कोणतीही भावना असो.मी सरळ ते लिहुन टाकतो.मग माझ्या मनाला खुप हल्लकता वाटते अणि मग मी मोकळा होऊन जातो.मग दुसरया दिवसापासुन मी पुन्हा माझ्या दैनंदिन दिनचर्याप्रमाणे आनंदाने जगणे चालू करुन देतो.जुने सर्व काही विसरुन.कारण लिहुन मी माझ्या मनातील सर्व भावना,वेदना,राग,तळमळ हे सर्व व्यक्त करुन मोकळा झालेला असतो.म्हणुन माझ्या मनावर काहीच दडपण,ओझे राहत नाही.म्हणजेच लिहिणे हे माझे स्वताला हलके करण्याचे,व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.हे आपल्या सर्वाना माझ्या हया विवेचनातुन स्पष्टपणे लक्षात येऊन जाते.
म्हणजेच प्रसार म्हणजे पसरविणे.अणि माध्यम म्हणजे स्वताला व्यक्त करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात.अणि हया दोघांचे एकत्रिकरण केल्यावर त्याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट पसरविण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला प्रसारमाध्यमे असे म्हटले जाते.अणि हयामध्ये अनेक माध्यमांचा समावेश होतो जसे की वृतपत्र हया प्रसारमाध्यमादवारे आपल्याला जगात कुठे काय घडले?काय झाले?हे कळते.कुठे नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत ते जाहीरातीतुन कळते.म्हणजेच वृतपत्र हया प्रसारमाध्यमाच्या आधारे आपल्याला जगात कुठे काय घडले?किंवा घडु राहिले किंवा कुठे नोकरीसाठी जागा निघाल्या हे कळते.
त्याचबरोबर अशी अनेक सामाजिक प्रसारमाध्यमे,माध्यमे आहेत ज्याच्याआधारे आपल्याला वेगवेगळे लाभ होतात.ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवणात आपल्याला वापर होतो.ज्यांच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवणात होणारे कष्ट कमी होतात.आपल्या वेळेची बचत होते.जसे की मोबाईल.मोबाईल जवळ असल्यामुळे आपण कितीही दुर परदेशात असलेल्या व्यक्तीशीही संपर्क साधु शकतो.त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आपल्याला तो जिथे आहे तिथे अजिबात जाण्याची गरज पडत नाही.आपण क्षणात त्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलु शकतो.किंवा आपल्याला त्याला जो संदेश पाठवायचा आहे तो व्हाँटस अँप हया सामाजिक प्रसारमाध्यमाच्या आधारेही त्याला पाठवु शकतो.
मला हया सर्वातुन एवढेच सांगायचे होते की तुम्ही फक्त तुमची नजर तीक्ष्ण ठेवा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे इतर कुठेही शोधण्याची गरज पडणार नाही.अणि प्रसारमाध्यमे म्हणजे काय? हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला खुप संदर्भासाठी लेख वाचण्याची आवश्यकता पण नाही. कारण प्रसार माध्यमे हया नावातच त्याचा अर्थही दडलेला आहे.फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे.तो ताडता आला पाहिजे.