पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी तरी हे सुदधा वाचुन बघा

पुस्तके तर आज सगळेच वाचतात
तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी हे पण वाचुन बघा

पुस्तके तर आज सगळेच वाचतात
फरक एवढाच आहे कोणी आज आँनलाईन
वाचते आहे तर कोणी आँफलाईन वाचते आहे
पण वाचन तर सगळेच करतात.
पण खरच तुम्हाला वाचायची
मनापासुन आवड आहे ना तर
अणि खरच तुम्हाला मनापासुन
वाचायचेच आहे तर
माणसांची डोळेही वाचुन बघा
त्या डोळयांमध्ये लपलेले अश्रुही 
कधी तरी वाचुन बघा
त्या अश्रुंमध्ये दडलेला
खरेपणा खोटेपणा वाचुन बघा.

कधी तरी गोरगरिबांचे डोळेही वाचुन बघा
त्या डोळयांमध्ये दडलेले अश्रु,दुखही
वाचुन बघा त्या दुखामध्ये
दडलेल्या त्यांच्या वेदना,तळमळ,
कळकळ वाचुन बघा

भुकेलेल्यांच्या डोळयांमध्ये
एकावेळचे अन्न मिळविण्यासाठी
जी तळमळ असते कळकळ असते ना
ती तळमळ ती कळकळ कधीतरी वाचुन बघा.

लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या
अनाथ मुला मुलींच्या डोळयातील
एकटेपणाचे,अनाथ असण्याचे
दुखही कधी वाचुन बघा.
आईवडिलांच्या मायेसाठी,प्रेमासाठी
त्या अनाथांचा जो जीव तळमळतो तडफडतो
कधी तोही तर वाचुन बघा.

शोषित,पीडीत,दलित,दीनदुबळयांचे
डोळयातील दुखही कधी वाचुन बघा
माणुस असुनही समाजाकडुन अमानवी वागणुक
मिळालेल्या त्या दीन दलितांच्या
डोळयांमधील अश्रुही कधी वाचुन बघा
त्या अश्रुंमध्ये दडलेला त्यांच्या
वेदना,विद्रोह अणि नकारही कधी वाचुन बघा
त्या वेदना,विद्रोह,अणि नकारामध्ये दडलेला
समाजव्यवस्थेविरुदधचा त्यांचा राग अणि संतापही
कधी वाचुन तर बघा.

कधी तरी वेळ काढुन
आपल्या आईचे डोळेही वाचुन बघा
आपल्या लेकरासाठी तळमळणारे,कळवळणारे
तिचे कोवळे मन ही कधी वाचुन बघा
आपल्या कुटुबांसाठी आपल्या सर्व ईच्छा
अपेक्षांचा त्याग करणारया
बळी देणारया प्रत्येक घरातील
त्यागमुर्तीचे प्रतिक असलेल्या
स्त्रीयांचे डोळेही कधी वाचुन बघा.

कधी तरी जातीभेद विसरुन
हया समाजात दुखात,वेदनेत जगत
असणारया आपल्याच देशातील
आपलेच बांधव असलेल्या प्रत्येक
जातीधर्मातील गोरगरिबांचे,शोषित,पीडीतांचे
दुख सुदधा कधीतरी वाचुन बघा.
जातीधर्माची चौकट ओलांडुन एकतरी
दिवस त्यांचेही डोळे कधी वाचुन बघा
त्या डोळयांमध्ये लपलेले अश्रु तसेच वेदना
वाचुन बघा.

कोणावर तरी एकेकाळी खुप जीवापाड प्रेम
करत असलेल्या तसेच त्याच प्रेमामुळे
चारचौघात हसु झालेल्या एखादया
प्रियकराचे मनही कधी वाचुन बघा.
त्या मनामध्ये दडलेले त्याचे एकतर्फी
प्रेमाचे दुखसुदधा कधीतरी वाचुन बघा.



शाळेत शिकायला जाण्याच्या वयात
चहाच्या टपरीवर एक एक रुपयांसाठी
भीक मागत फिरणारया व भीक मागत
असताना लोकांच्या अपमानास्पद वागणुकीला
सामोरे जाणारया त्या चिमुरडयांच्या
वेदना सुदधा कधी तरी वाचुन बघा.
          कवी:योगेश सोनवणे (एम ए दितीय वर्ष मराठी)
          

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.