Posts

एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग

             एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग                  एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग हे कधी संपता संपत नाही जेव्हा ती आईच्या गर्भात असते तेव्हा तिची गर्भातच हत्या केली जाते कारण सगळयांना मुलगा हवा असतो मुलगी नको असते. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानला जातो प्रत्येक आईबापाची अशी ईच्छा असते की आम्ही मेल्यावर आमच्या पार्थिवाला अग्नी देणारा एक वारस पाहिजे.म्हणुन मुलगी ही कोणालाच नको असते त्याचसाठी तिची आईच्या गर्भात असतानाच हत्या केली जाते आणि समजा जरी ती हया जगात जन्माला आली ही तरी जीवनात क्षणोक्षणी तिची हत्याच केली जाते तिच्या ईच्छांची,अपेक्षांची,हक्कांची पावलोपावली हत्याच केली जाते.मग ती बहिण म्हणून असो किंवा मुलगी, आई म्हणुन असो पण आयुष्यात पावलोपावली तिच्या ईच्छा अपेक्षांना,हक्कांना पायदळी तुडवले जाते.              जेव्हा ती एक बहिण म्हणून वावरत असते तेव्हा मुलांच्या  शिक्षणासाठी खर्च करायला पैसा नाही अशी परिस्थिती जेव्हा घरात निर्माण होते तेव्हा फक्त...

अजुनही ही जात का नाही जात आहे?

अजुनही ही जात का नाही जात आहे?    आज संध्याकाळी आई मला म्हणाली.जा दुकानातुन साखर घेऊन ये.मग मी घरातुन दुकानात जाण्यासाठी पायी निघालो अणि रस्त्याने दुकानाच्या दिशेने चालत जात होतो.तेवढयात समोरुन माझा एक हिंमतनगर येथील एक फार जुना मित्र मोटारसायकल वरुन येत होता.त्याने मला आवाज दिला काय माऊली कसे आहात?मी पण त्याला प्रतिसाद देत म्हणालो.हो भाऊ मी एकदम मजेत आहे.मग त्यानंतर तो त्याच्या दिशेने निघुन गेला.पण तो तर निघुन गेला पण त्यानंतर माझ्या मनामध्ये एक वेगळेच काहुर उठले.    मनात विचार आला की किती सहजासहजी हा मुलगा मला माऊली म्हणुन हात देऊन त्याच्या दिशेने निघुन गेला.पण मी खरच माऊली म्हणण्यायोग्य आहे का?किंवा आपण रोज एकमेकांना साहेब,राजे,माऊली अशा शब्दांनी हाक मारतो.पण खरच आजचा माणुस स्वताला माऊली म्हणुन घेण्याच्या लायक आहे का?स्वताला राजे किंवा साहेब म्हणुन घेण्यायोग्य आहे का?अजिबात नाही तरी आपण किती सहजासहजी एकमेकांना माऊली,राजे,साहेब अशा नावाने हाक मारतो.पण आपल्याला त्याचा खरा अर्थ कळतो का?       मग माझ्या मनात प्रश्न उत्पन्न झाला माऊली म्हणजे काय?अणि आपण ...

प्रेमाचे गोड विष

*प्रेमाचे गोड विष*                तरुण वयामध्ये आपल्याला एखादी व्यक्ती आवडणे अणि आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे ही एक साहजिकच गोष्ट आहे अणि तरुणवयात ही  बाब सर्वांसोबत घडते.ही काही खुप मोठी विशेष गोष्ट नाहीये. फक्त ज्यांना ते प्रेम प्राप्त होते त्यांच्यासाठी ते अमृत ठरते तर ज्यांना ते प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी ते विष ठरत असते म्हणून मी प्रेमाला गोड विष म्हणतो.             कारण सुरूवातीला प्रेम हे आपल्याला फार मधासारखे गोड वाटते पण नंतरुन तेच प्रेम आपल्यासाठी विष ठरत असते. विष हे जसे आपला जीव घेते तसेच प्रेमही आपला जीव घेते फक्त फरक एवढाच आहे की विष प्राशन केल्यानंतर आपण शारीरिक दृष्ट्या मृत होतो आपल्या देहापासुन आपला आत्मा मुक्त होतो व तो अनंतात जाऊन विलिन होतो.अणि प्रेमाचे विष प्राशन केल्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या मृत होतो व आपला आत्मा आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्यात जाऊन विलिन होतो म्हणून प्रियकर प्रेयसी यांना दोन जीव एक प्राण असे म्हटले जाते.का...

माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक,वाडमयीन जडणघडणीत मोलाचा वाटा असणार्‍या माझ्या प्राध्यापिका,तसेच लेखिका, बालसाहित्य समीक्षक विदया सुर्वे बोरसे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिर्घ लेख आहे सगळयांनी हा नक्की वाचावा

○ * माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक,वाडमयीन जडणघडणीत मोलाचा वाटा असणार्‍या माझ्या प्राध्यापिका,तसेच लेखिका, बालसाहित्य समीक्षक विदया सुर्वे बोरसे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिर्घ लेख आहे सगळयांनी हा नक्की वाचावा* * *     माझ्या महाविद्यालयीन जीवनात आत्तापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक जडणघडणीत खुप लोकांचा मोलाचा वाटा आहे.ज्यात महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा,प्राध्यापिकांचा समावेश होतो. त्याच प्राध्यापकांपैकी,प्राध्यापिकांपैकी दोन प्राध्यापिकांचा उल्लेख मी नेहमी आवर्जून करत असतो.एक प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे अणि दुसर्‍या  प्राध्यापिका स्नेहल मराठे.      माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक जडणघडणीत सर्वात प्रथम पहिला अणि मोलाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे ज्या बालसाहित्य समीक्षक आहेत.तसेच प्राध्यापिका स्नेहल मराठे यांचा आहे ज्या मराठी भाषेच्या,भाषाविज्ञानाच्या अभ्यासक आहेत.सध्या त्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन कार्यरत नाही आहे. कारण त्यांची दुसर्‍या म...

एक विचार माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.

एक विचार माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.      एकेदिवशी मी रोजप्रमाणे झोपण्याच्या अगोदर मी माझ्या मोबाईलवर आलेले संदेश वाचत होतो.त्यातच एक संदेश आला होता.माझ्या एका मित्राचा जो मी एम ए प्रथम वर्षाला ज्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात शिकत होतो.त्याच महाविद्यालयात तो बी. ए च्या दितीय वर्षामध्ये शिकत आहे.आमचे रोज एकमेकांना संदेश चालुच असतात. कसा आहेस? कस चालले आहे तुझे वगैरे वगैरे.पण एकेदिवशी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान मला त्याचा अचानक एक संदेश आला की भाऊ मला जगायची अजिबात ईच्छाच राहिली नाहीये.कारण माझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही आहे.       मी विचारातच पडलो की सकाळीच तर आमचे बोलणे झाले होते तेव्हा तर हा एकदम व्यवस्थित होता.अचानक याला असे काय झाले की याला जगायची अजिबात ईच्छाच राहिली नाही आहे.मी त्याला सांगितले काय झाले मला व्यवस्थित समजावुन सांग तु काय बोलतो आहे मला काहीच कळू नाही राहिले.त्यावर तो म्हणाला की भाऊ काही समजु नाही राहिले यार माझ डोकच चालू नाही राहिले.अस वाटत आहे की आयुष्य संपवुन घ्यावा.मग मी त्याला म्हणालो क...

माझ्या दुखाचे कारण काय?

आत्मसंशोधनपर लेख :  माझ्या दुखाचे कारण काय?      दुखाचे कारण काय? हा प्रश्न जेव्हा गौतम बुदधांना पडला होता.तेव्हा ते खुप व्याकुळ झाले होते.माणुस हा एवढा दुखी का आहे? याचे कारण त्यांना शोधायचे होते.तेव्हा ते हया प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी घर,परिवार, ऐश्वर्य,धन संपत्ती हया सगळयांचा त्याग करुन जंगलात हया प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निघाले होते.अणि आज तोच सिदधार्थ जो दुखाचे कारण शोधण्यासाठी निघाला होता.तो आज सगळीकडे बुदध म्हणुन ओळखला जातो.म्हणुनच असे म्हटले जाते की सिदधार्थ बुदध झाला.पण आता काळ बदलला आहे वेळही बदलली आहे.त्यामुळे दुखाचे कारण काय? हे शोधण्यासाठी आपल्याला दुर जंगलात किंवा इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.कारण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्या घटना प्रसंगांकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला आपल्या दुखाचे मुळ कारण काय हे लगेच सहजपणे समजुन जाईल.        खुप दिवसांपुर्वी मी माझ्या स्वताला एक प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यात जे दुख आहे त्या दुखाचे कारण तरी नेमके काय आहे?मग मी लागलो कामाला अणि माझ्या दैनंदिन जीवनातील घडणार्या प्रत्येक घटना ...

मुर्ती लहान पण किर्ती महान

(हा लेख मी माझ्या भावाविषयी लिहिला आहे. जो मुर्ती तर लहान आहे पण किर्ती त्याची महान आहे.असे मीच नाही तर मालेगावातील सर्व उच्च प्रतिष्ठित लोक,ज्यांचे मालेगावात वर्चस्व आहे. ते माझ्या भावाविषयी म्हणतात.) मुर्ती लहान पण किर्ती महान      मुर्ती लहान किर्ती महान हे वाक्य मी जेव्हा बी.ए च्या पहिल्या वर्षात होतो तेव्हापासुन तर आतापर्यत मला नेहमी माझ्या घरात अणि घराच्या बाहेर नेहमीच ऐकु येत आले आहे.हे वाक्य मला नेहमी लोकांकडुन माझ्या मोठया भावाविषयी ऐकु येत आले आहे.तसे पाहायला गेले तर मला दोन मोठे भाऊ अणि मी घरात सगळयात लहान अणि घरात सगळयात लहान असल्यामुळे सगळयांचा सर्वात लाडका पण मीच.असे आम्ही एकुण तीन भाऊ.माझ्या एका मोठया भावाचे नाव निलेश.निलेश हा स्वभावाने शांत,समजुतदार.अणि माझ्या दुसरया मोठया भावाचे नाव मंगेश.      मंगेश याला लहानपणापासुनच राजकारणाची आवड होती.म्हणुन बी.काँम च्या पहिल्या वर्षात विषय राहिल्यामुळे त्याने शिक्षण अर्धवटच सोडले.अणि तशी त्याला शिक्षणाची आवड नव्हतीही.त्याला आवड होती राजकारणाची.त्यातही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाक...