एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग

             एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग
                 एका मुलीच्या आयुष्यातील दुखाचे भोग हे कधी संपता संपत नाही जेव्हा ती आईच्या गर्भात असते तेव्हा तिची गर्भातच हत्या केली जाते कारण सगळयांना मुलगा हवा असतो मुलगी नको असते. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानला जातो प्रत्येक आईबापाची अशी ईच्छा असते की आम्ही मेल्यावर आमच्या पार्थिवाला अग्नी देणारा एक वारस पाहिजे.म्हणुन मुलगी ही कोणालाच नको असते त्याचसाठी तिची आईच्या गर्भात असतानाच हत्या केली जाते आणि समजा जरी ती हया जगात जन्माला आली ही तरी जीवनात क्षणोक्षणी तिची हत्याच केली जाते तिच्या ईच्छांची,अपेक्षांची,हक्कांची पावलोपावली हत्याच केली जाते.मग ती बहिण म्हणून असो किंवा मुलगी, आई म्हणुन असो पण आयुष्यात पावलोपावली तिच्या ईच्छा अपेक्षांना,हक्कांना पायदळी तुडवले जाते. 
            जेव्हा ती एक बहिण म्हणून वावरत असते तेव्हा मुलांच्या  शिक्षणासाठी खर्च करायला पैसा नाही अशी परिस्थिती जेव्हा घरात निर्माण होते तेव्हा फक्त तिचेच शिक्षण सगळयात आधी बंद करण्यात येते. कारण प्रत्येक आईवडीलांचा हा समज असतो की मुलगी शिकुन तरी काय करणार आहे सासरी जाऊन चुलच फुंकणार आहे. मग कशाला तिच्या शिक्षणावर एवढा खर्च करायचा असे म्हणुन तिचे शिक्षण थांबवण्यात येते.इथुन तिच्या हक्काचे बळी घेण्याची जी सुरुवात होते आणि ती तिच्या हक्काचे, ईच्छा अपेक्षांचा बळी घेण्याची ही प्रथा ही तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालुच असते कधी बहिणीच्या,मुलीच्या,आईच्या इत्यादी रुपात तिला पावलोपावली तिला तिच्या हक्कांपासुन वंचित ठेवण्यात येते. 
           इतकेच नव्हे तर जेव्हा तिच्या लग्नासाठी मुलगा बघण्याची वेळ येते तेव्हा तिला एकदाही विचारले जात नाही की तुला हा मुलगा पसंत आहे का नाही ? तुझ्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आहे का?तुझे कोणावर प्रेम आहे का? सरळ तिचे एका अशा मुलाशी लग्न लावून दिले जाते ज्याला ती नीट ओळखत सुद्धा नाही ज्याच्यावर तिचे अजिबात प्रेम नाही. अणि ती ही आईवडिलांच्या हया निर्णयाविरुदध जात नाही कारण तिला आपल्या आईवडिलांना दुखवायचे नसते. समाजात त्यांची मान खाली जाऊ दयायची नसते.म्हणुन ती तिच्या ईच्छा अपेक्षांचा प्रेमाचा बळी देऊन आईवडिलांनी सुचवलेल्या मुलाशी निमुटपणे लग्न करून घेते.अणि एका अशा व्यक्तीसोबत तिचे  संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्यासाठी तयार होते ज्याला ती नीट ओळखत सुदधा नाही.अणि ती हे करते ते केवळ तिच्या आईवडिलांच्या प्रेमापोटी समाजात त्यांना जो खोटा अभिमान बाळगायचा असतो त्या खोटया अभिमानापोटी तिचा बळी दिला जातो.
               अणि लग्न झाल्यानंतर जेव्हा तिचा एक सुन एक पत्नी एक आई म्हणून प्रवास सुरू होतो तिथेही तिला तिच्या ईच्छा अपेक्षांचा बळीच देऊनच जगावे लागते.घरातील सगळ्यांची मर्जी राखावी लागते. सगळयांना काय हवे काय नको हे बघावे लागते.भलेही मग तिला त्यासाठी स्वताचे मन मारून जगावे लागले तरी चालेल.अणि त्यातच तिला सासर अणि नवरा चांगला मिळाला तर ठिक नाहीतर तिला सासु सासरयांचा नवरयाचा सासरवासही सहन करावा लागतो.अणि तोही निमुटपणे कारण प्रत्येक मुलीला लग्नाअगोदर हेच सांगितले जाते की नवरा म्हणजे आपला परमेश्वर असतो त्याची मर्जी राखायची मग भलेही तो नवरा दारू पिऊन तिला मारहाण करणारा असेल पण पती हाच परमेश्वर ही शिकवण तिला लग्नाअगोदर दिली जाते.म्हणुन ती नवरयाचा सासु सासरयांचा जाच निमुटपणे सहन करत असते. केवळ आईवडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळे ती हे सर्व भोग भोगत असते. 
               अशी असते एका मुलीच्या आयुष्यातील दुखाची कहाणी अणि तिचे भोग जे तिला जन्मापासून मृत्यूपर्यंत भोगावेच लागतात. अणि तिच्या आयुष्यातील दुखाचा प्रवास हा सतत चालुच असतो कधी कोणाची मुलगी म्हणून वावरत असताना तर कधी कोणाची बहिण म्हणून तर कधी कोणाची आई, पत्नी,सुन म्हणून वावरत असताना.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.