प्रेमाचे गोड विष

*प्रेमाचे गोड विष*
               तरुण वयामध्ये आपल्याला एखादी व्यक्ती आवडणे अणि आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे ही एक साहजिकच गोष्ट आहे अणि तरुणवयात ही  बाब सर्वांसोबत घडते.ही काही खुप मोठी विशेष गोष्ट नाहीये. फक्त ज्यांना ते प्रेम प्राप्त होते त्यांच्यासाठी ते अमृत ठरते तर ज्यांना ते प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी ते विष ठरत असते म्हणून मी प्रेमाला गोड विष म्हणतो.
            कारण सुरूवातीला प्रेम हे आपल्याला फार मधासारखे गोड वाटते पण नंतरुन तेच प्रेम आपल्यासाठी विष ठरत असते. विष हे जसे आपला जीव घेते तसेच प्रेमही आपला जीव घेते फक्त फरक एवढाच आहे की विष प्राशन केल्यानंतर आपण शारीरिक दृष्ट्या मृत होतो आपल्या देहापासुन आपला आत्मा मुक्त होतो व तो अनंतात जाऊन विलिन होतो.अणि प्रेमाचे विष प्राशन केल्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या मृत होतो व आपला आत्मा आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्यात जाऊन विलिन होतो म्हणून प्रियकर प्रेयसी यांना दोन जीव एक प्राण असे म्हटले जाते.कारण प्रेमात पडल्यावर माणसाला कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही.
           आपल्यासाठी काय वाईट आहे? आणि काय चांगले आहे? कशात आपले हित आहे?आणि कशात आपले अहित आहे?आपण काय करतो आहे? काय नाही आपण कसे वागतो आहे? कोणत्याच गोष्टीचे भान आपल्याला राहत नाही आपण फक्त मी माझे प्रेम अणि माझा प्रियकर,माझी प्रेयसी एवढयाच जगात वावरत असतो त्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट आपल्याला दिसत नसते.
          म्हणुन म्हणतात की प्रेम हे आंधळे असते ज्याच्या पुढे आपल्याला इतर कोणतीच गोष्ट दिसत नसते.आपण आपले कुटुंब,मित्र इत्यादी सर्व गोष्टी त्यात विसरून जातो अणि फक्त आपल्या प्रेमाच्या दुनियेत वावरत असतो अशीच एक माझ्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे.
           ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी केबीएच तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो.संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी माझा एक खास अणि जीवलग मित्र बनला त्याचे नाव दिलीप होते. दिलीप हा एक उत्कृष्ट पेंटर होता पण तो त्याचे आवडते पेंटिंगचे क्षेत्र सोडुन अभियांत्रिकी चे शिक्षण घेण्यासाठी आला होता.त्याला वडील नव्हते त्यामुळे तो त्याच्या आईची एकमेव आशा अणि आधार होता म्हणून त्याच्या आईने त्याला अभियांत्रिकी शिक्षणासाठी टाकले असावे असा माझा अंदाज होता अणि ते खरे ही होते पण माझा अंदाज थोडा चुकीचा ठरला होता दिलीप हा त्याच्या आईच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाहीतर आपल्या प्रेमाच्या ओढीमुळे अभियांत्रिकी शिक्षणासाठी आला होता.
             कारण तो ज्या मुलीवर प्रेम करत होता तिने संगणक अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता आणि फक्त तिला पाहता यावे ती आपल्या डोळ्यासमोर असावी आणि तिच्यासोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून त्याने अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता.फक्त आपल्या प्रेयसीसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी तो अभियांत्रिकी क्षेत्रात आला होता.अणि त्याची अणि माझी स्थिती ही काही सारखीच होती तो ही प्रेमापोटी आला होता आणि मी ही प्रेमापोटीच आलो होतो फक्त फरक एवढाच होता की तो त्याच्या प्रेयसीच्या प्रेमापोटी आला होता आणि मी माझ्या आईच्या ईच्छेपोटी,प्रेमापोटी आलो होतो तस माझी अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण करण्याची अजिबात ईच्छा नव्हती पण आपल्या मैत्रिणीची मुलगी,मुलगा डिप्लोमा इंजिनीअरिंगला अँडमिशन घेती,घेतो म्हणून माझ्याही मुलीने,मुलाने तेच शिक्षण करावे ही जशी प्रत्येक आईवडिलांची ईच्छा,अपेक्षा असते तशीच उत्कट ईच्छा माझ्या आईची पण होती आणि तीची तीच ईच्छा पूर्ण करण्यासाठी मी केबीएच तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक क्षेत्रात प्रवेश घेतला होता.
           असो माझ्या विषयी नंतर एखाद्या वेळी निवांत लेखन करुन मी तुम्हाला सांगेन माझ्या लेखाच्या मुळ विषयाकडे आपण वळूया.फक्त आपल्या प्रेमाच्या ओढीकरता अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला दिलीप हा काही मोठया घरातील नव्हता अणि त्याच्याशी माझी मैत्री झाल्यावर मला त्याची सर्व परिस्थितीचा अंदाज आला डोक्यावर वडिलांची छाया नाही आईला त्याच्याशिवाय दुसरा  काही आधार नव्हता.घरची परिस्थिती गरिबीची अणि घरात मोठा तोच होता अणि अशा परिस्थितीत तो एका मुलीच्या गाढ प्रेमात पडला होता आणि तीही त्याच्यावर प्रेम करायची दोघे एकमेकांशिवाय राहु शकत नव्हते.त्याची अणि माझी खूप गाढ मैत्री झाल्यामुळे तो त्याच्या सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचा.
          अणि एकेदिवशी त्याने मला त्याची सर्व प्रेमकथा सांगितली की त्याच्याच घराजवळ एक मुलगी राहते तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तीही त्याच्यावर प्रेम करते पण ती वेगळया जातीची होती आणि तो वेगळया जातीचा होता म्हणून घरचे त्यांच्या लग्नाला विरोध करतील मान्यता देणार नाही असे तो मला सांगत होता अणि तो तिच्या प्रेमात ईतका वाहुन गेला होता की खास तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तिचा सहवास प्राप्त व्हावा यासाठी तो त्याचे कामधंदे सोडुन अभियांत्रिकी शिक्षणासाठी आला होता.दिवसभर महाविद्यालयात मनाविरुद्ध वागून तो रोज काढायचा अणि त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा त्या मुलीवरच जास्त असायचे.ती कोणाशी  बोलते कोणात राहते तिच्या मैत्रीणी कोण आहे हया सर्व गोष्टींकडे तो बारकाईने लक्ष ठेवायचा मग एकेदिवशी मी त्याला खुप  खडसावले की जर तु तिच्यावर एवढ प्रेम करतो मग तुला तिच्यावर विश्वास ठेवता येत नाही का सतत तु तिच्या पाळतीवर असतो ती कोणाशी बोलते कोणात राहते काय करते तिला तु मोकळीक का देत नाही त्यावर तो माझ्यावर न चिडता मला तो म्हणाला अरे तु म्हणतो ते एकदम बरोबर आहे पण तिला भाऊ नाहीये तिच्याकडे लक्ष द्यायला अणि आजकाल मुलांची नियत काही चांगली नाहीये म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवून असतो तिला कोणी त्रास देऊ नये म्हणून.
            त्याचे त्या मुलीवरचे प्रेम त्याला अमृतासारखे गोड वाटत होते पण काही दिवसांत त्याचे तेच प्रेम त्याच्यासाठी विष ठरले.कारण तिच्या विचारात तो अभ्यासात लक्ष केंद्रीत करू शकत नव्हता.त्यामुळे सतत त्याचे विषय राहुन जायचे.अणि त्यात अभियांत्रिकीची फी ही काही कमी नव्हती तरी त्याच्या आईने कशीबशी त्याची फी भरत होती आणि त्यात तो पुन्हा पुन्हा विषय राहुन जात होता कारण तो त्या मुलीमध्ये इतका गुरफटला होता की तिच्याशिवाय त्याला दुसरे काही दिसतच नव्हते त्याच्या आईचे कष्ट त्याच्या शिक्षणासाठी तिचा चाललेला आटापिटा हे काहीच त्याला दिसत नव्हते कारण त्याच्या डोळ्यावर प्रेमाची पटटी बांधली गेली होती. त्यामुळे त्याला घरची परिस्थिती त्याच्या आईची त्याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी होणारी तगमग,घालमेल इतर काहीच त्याला दिसत नव्हते.
            अणि एकेदिवशी त्याला कळले की तिचे लग्न ठरले आहे. तो हे कळताच आणखी नैराश्यात गेला आणि त्या मुलीचेही त्याच्यावर खुप प्रेम होते त्यामुळे तीपण त्याच्याशिवाय इतर कोणाशी लग्न करायला तयार नव्हती. पण त्या मुलीच्या वडिलांचा जातीच्या बाहेरील मुलाशी लग्न लावून देण्यास स्पष्ट नकार होता.त्यामुळे दिलीप हा हतबल झाला होता काय करावे हे त्याला कळत नव्हते अणि एकेदिवशी त्याला बाहेरून कळाले की तिने हाताची नस कापुन घेतली होती आणि ती दवाखान्यात अँडमिट होती.विचारपुस झाल्यानंतर तिच्या घरच्यांना तिच्या असे वागण्यामागचे कारण कळाले पण ती प्रेम करीत असलेला मुलगा हा त्यांच्या जातीबाहेरचा मुलगा आहे हे समजल्यावर घरच्यांनी तिच्या प्रेमाला नकार दिला अणि काही दिवसातच तिचे बळजबरी दुसर्‍या मुलाशी लग्न लावून दिले.
          हे कळल्यावर दिलीप जास्तच डिप्रेशन मध्ये गेला आणि त्यात काही दिवसातच आमचे पेपर होणार होते पण तिच्या विचारांमध्ये तिच्या विरहाच्या दुखामध्ये तो इतका वाहत गेला होता की अभ्यासात त्याचे लक्षच लागत नव्हते. मग काही दिवसांत आमचे पेपर झाले अणि त्याचा रिझल्टही आला आणि त्यात तो सर्व विषयांत नापास झाला.अणि काही दिवसातच त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयातुन दाखला काढुन घेतला.त्याच्या आईने त्याच्या शिक्षणासाठी जेवढा पैसा खर्च केला होता तो सगळा आता वाया गेला होता.अणि जिच्यामुळे हे सर्व घडल होत ती तिच्या मार्गाने निघुन गेली होती.
           म्हणजेच दिलीप त्याच्या आईच्या कष्टाचे पण चीज करू शकला नाही अणि जिच्यासाठी त्याने सर्व कामधंदे,शिक्षण सोडुन दिले होते आणि तो फक्त तिच्यामागेच वेडा झाला होता ती मुलगीही त्याला मिळाली नाही.म्हणजेच त्याचे प्रेम हे विष ठरले होते त्याच्यासाठी अणि त्याच्या आईसाठीही तिने पाहिलेल्या स्वप्नांसाठी.दिलीपचे प्रेम हे त्याच्यासाठी हे गोड विष ठरले होते जे सुरुवातीला प्राशन करताना त्याला खुप मधासारखे गोड वाटले पण नंतरून त्याचे तेच प्रेम त्याच्यासाठी एक विष ठरले होते एक गोड विष.
                  - *योगेश सोनवणे*


Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.