मुर्ती लहान पण किर्ती महान
(हा लेख मी माझ्या भावाविषयी लिहिला आहे. जो मुर्ती तर लहान आहे पण किर्ती त्याची महान आहे.असे मीच नाही तर मालेगावातील सर्व उच्च प्रतिष्ठित लोक,ज्यांचे मालेगावात वर्चस्व आहे. ते माझ्या भावाविषयी म्हणतात.)
मुर्ती लहान पण किर्ती महान
मुर्ती लहान किर्ती महान हे वाक्य मी जेव्हा बी.ए च्या पहिल्या वर्षात होतो तेव्हापासुन तर आतापर्यत मला नेहमी माझ्या घरात अणि घराच्या बाहेर नेहमीच ऐकु येत आले आहे.हे वाक्य मला नेहमी लोकांकडुन माझ्या मोठया भावाविषयी ऐकु येत आले आहे.तसे पाहायला गेले तर मला दोन मोठे भाऊ अणि मी घरात सगळयात लहान अणि घरात सगळयात लहान असल्यामुळे सगळयांचा सर्वात लाडका पण मीच.असे आम्ही एकुण तीन भाऊ.माझ्या एका मोठया भावाचे नाव निलेश.निलेश हा स्वभावाने शांत,समजुतदार.अणि माझ्या दुसरया मोठया भावाचे नाव मंगेश.
मंगेश याला लहानपणापासुनच राजकारणाची आवड होती.म्हणुन बी.काँम च्या पहिल्या वर्षात विषय राहिल्यामुळे त्याने शिक्षण अर्धवटच सोडले.अणि तशी त्याला शिक्षणाची आवड नव्हतीही.त्याला आवड होती राजकारणाची.त्यातही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खुप मोठा चाहता.त्यामुळे आमच्या घरात घरातल्या व्यक्तिंचे जेवढे फोटो लावेल नसतील त्यापेक्षा जास्त राज ठाकरेंचेच फोटो लावलेले राहायचे.राज ठाकरेंचा खुप मोठा चाहता असल्यामुळे त्याने एकदाचे ठरवले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आता प्रवेश करायचाच.तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील हे होते.माझा भाऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात गेला अणि म्हणाला मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करायचा आहे.तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील यांनी त्याला पद देण्यास स्पष्ट नकार दिला.कारण माझा भाऊ हा दिसायला बारीक,उंचीने लहान तसेच तब्येतीनेही तेव्हा काही एवढा धष्टपुष्ट नव्हता.त्यामुळे एवढया लहान मुलाला पद देणे योग्य नाही असे त्यांना वाटले असावे.त्यामुळे त्यांनी त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पद देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
पण माझा भाऊ हा खुप जिददी तो ऐकायलाच तयार नव्हता.तो म्हणाला मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करायचाच आहे.मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील यांनी त्याच्यापुढे एक अट घातली
की तु मला असे एक कारण सांग ज्यामुळे मी तुला पद देऊ.तु हयाक्षणी आत्ता असे काय करु शकतो की मला वाटावे मी तुला पद दयायला हवे.माझा भाऊ बोलला तुम्हीच सांगा काय करु?त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील म्हणाले की तु हयाक्षणी कमीत कमी मला 30 ते 40 लोक गोळा करुन दाखव, तुझ्यामागे असलेला लोकांचा पाठिंबा दाखव मी लगेच तुला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पद देतो.
माझ्या भावाने पण त्यांच्या हया प्रस्तावाला होकार दिला.अणि त्याने जिथे उभा होता त्या जागेवर उभा राहुनच फक्त एक फोन लावला.अणि मोजुन दहा मिनिटातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात अक्षरश गर्दी मावेणा एवढया मुलांची,लोकांची गर्दी गोळा झाली.मालेगावातील कानाकोपरयातील मुले,लोक त्याला पद दयावा यासाठी तिथे आलेहोते.कँम्पातील पंचशिलनगर,गवळीवाडा,आंबेडकरनगर,संग्मेश्वर,कलेक्टर पटटा,सोयगाव,शिवाजी नगर सांगायला नावे कमी पडतील एवढया ठिकाणाची लोक त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पद मिळावे हयासाठी आली होती.मालेगावातील कानाकोपरयातील लोक तिथे जमा झाली होती.फक्त त्याला पद दिले जावे हयासाठी.महाराष्ट नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील ज्यांनी माझ्या भावाला खुले आव्हान केले होते की तु मला कमीत कमी 30 ते 40 मुले जमवुन दाखव.ते माझ्या भावाकडे थक्क होऊन एकटक बघतच राहिले.(कदाचित त्यांना हा पण प्रश्न पडला असावा की दिसायला हा मुलगा एवढा एवढा छटाकभर दिसतो पण याच्यामागे माझ्यामागेही नाही एवढा भरघोस सामाजिक पाठिंबा आहे.) दोन मिनिटे ते एकटक थक्क होऊन माझ्या भावाकडे पाहत राहिले. अणि त्याच्यामागे असलेला मुलांचा,लोकांचा भरघोस पाठिंबा बघुन अणि माणसे जमवण्याचे संघटित करण्याचे त्याचे कौशल्य बघुन त्यांनी माझ्या भावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटकचे पद दिले.
अणि मग तिथेच बाजुला उभे असलेले कलेक्टर पटटयातील मनसेचे नगरसेवक बाळु काशिनाथ आहिरे(माझे दाजी) हे पुढे आले अणि सांगु लागले की हा माझा साला आहे.तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील दाजींना म्हणाले की तुमचा साला हा मुर्ती लहान आहे. पण किर्ती खुप महान आहे.त्याच्याकडे बघुन वाटत नाही की त्याच्यामागे एवढा सामाजिक पाठिंबा आहे.अणि अक्षरश त्यांनी माझ्या भावाला आनंदाने कडेवरच उचलुन घेतले.त्यांना त्याचे हया गोष्टीचे खुपच कौतुक वाटले की एवढा लहान जीव अणि त्याच्यामागे एवढा प्रचंड पाठिंबा.
हा तर नगरसेवकला उभा राहिला तरी निवडुन येईल.असे ते म्हणु लागले.अणि खरे तर माझ्या भावाची पण ईच्छा होती नगरसेवकला उभे राहण्याची पण घरच्यांनी विरोध केल्यामुळे त्याने मग तो नाद सोडला.आता त्याची स्वताची फँमिली ट्रँव्हल्स आहे.
तेव्हापासुन माझा भाऊ अणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप बापु पाटील हे चांगलेच मित्र बनले.मालेगावात काहीही काम असले तर ते पहिले माझ्या भावालाच फोन करायचे अणि अजुनही करतात.
सुरुवातीला तालुका संघटक अणि मग नंतर जिल्हा संघटक अशी दोन पदे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मिळाली.हयानंतरही त्याला मनसेचे तालुकाप्रमुख किंवा जिल्हाप्रमुख पद मिळाले असते. पण त्याने तेव्हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडुन दिली .एवढेच काय तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना मुंबईला जाऊन राज ठाकरे यांना सुदधा त्यांच्या निवासस्थानी जाऊन समक्ष भेटुन आला होता.अणि मग सलग तीन वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काढल्यानंतर काही वर्षानी त्यानी अणि संदीप बापु पाटील,सुनिल आबा गायकवाड,माझे दाजी मनसे नगरसेवक बाळु आहिरे यांनी सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडली.
एवढेच काय तर मालेगाव तालुक्यातील,नाशिक जिल्हयातील मोठमोठया राजकीय कार्यकत्यांपासुन,पोलिस कर्मचारी,वकिल,पत्रकार तर थेट आमदारही त्याला फक्त त्याच्या नावाने ओळखतात.एवढा त्याच्यामागे भरघोस सामाजिक पाठिंबा आहे.अणि कोरोनाच्या पारश्ववभुमीत 11 एप्रिल अणि 14 एप्रिलसाठी संग्मेश्वरात जी महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती स्थापण करण्यात करण्यात आली होती.त्याचे सचिव पदही त्याला स्वताहुन समाजातील लोकांनी दिले होते.
इतकेच नाही तर कोरोना महामारीच्या काळात आमच्या परिसरातील काही गरजु वृदध लोक ज्यांना घराबाहेर पडणे मुश्किल होते त्यांना त्याने स्वखर्चातुन किराणाही घरबसल्या भरुन दिला.त्याचबरोबर मोहल्यात मुसलमान वार्डात जाऊन कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना त्याने स्वता पाणीवाटपसुदधा केले.अशी अनेक समाजकार्य त्याने केली.
आमच्या पुष्पाताई हिरे नगरमध्ये इथला नगरसेवक जेवढा प्रसिदध नाही त्यापेक्षा जास्त माझा भाऊ आहे.असे म्हणायला मलातरी काहीच हरकत वाटत नाही.अणि माझ्या शिक्षणाचा सर्व खर्चही तोच करु राहिला.त्याने घरच्यांना तशी ताकीदच दिली आहे की त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी उचलेल.पण त्याला हवे तेवढे शिकु दयायचे.त्याचे शिक्षण बंद करायचे नाही.अणि माझा भाऊ कुठेही बाहेरगावी भाडे मारायला गेला का येताना नेहमी माझ्यासाठी काहीना काही घेऊनच येतो.
असा आहे माझा भाऊ सगळयांना मदत करणारा राजकारणात पुर्ण उतरला असता तर नक्कीच मालेगावात आमदारकीलाही उभा राहिला असता.खुप शिकला नाही.पण त्याने आयुष्यात माणुसकी इतकी जपली की त्याच्या फक्त एका फोनवर सुदधा मालेगावात माझी सगळी कामे होऊन जातात.त्याच्या एका हाकेवर अर्धे मालेगाव त्याच्यासाठी जीव दयायला तयार होऊन जाते.अणि आत्तापर्यत त्याने जे पेरले आहे तेच माझ्यासाठी उगवते आहे.त्याच्या एका शब्दावर माझी सगळी कामे होऊन जातात.अणि तो माझ्या पाठिशी खंबीर आहे म्हणुन आत्तापर्यत कधी माझ्या केसालाही कधी धक्का लागला नाही.
म्हणुन माझ्या भावाचे कौतुक करताना मला एकच गाणे आठवते.
" मेरा भाई तु मेरी जान है मेरा भाई तु मेरी शान है".
अगदी लोक म्हणतात तसाच आहे माझा भाऊ मनमिळाऊ,हसमुख,समाजप्रिय,सगळयांचा लाडका मुर्ती लहान पण किर्ती महान असा.