अजुनही ही जात का नाही जात आहे?
अजुनही ही जात का नाही जात आहे?
आज संध्याकाळी आई मला म्हणाली.जा दुकानातुन साखर घेऊन ये.मग मी घरातुन दुकानात जाण्यासाठी पायी निघालो अणि रस्त्याने दुकानाच्या दिशेने चालत जात होतो.तेवढयात समोरुन माझा एक हिंमतनगर येथील एक फार जुना मित्र मोटारसायकल वरुन येत होता.त्याने मला आवाज दिला काय माऊली कसे आहात?मी पण त्याला प्रतिसाद देत म्हणालो.हो भाऊ मी एकदम मजेत आहे.मग त्यानंतर तो त्याच्या दिशेने निघुन गेला.पण तो तर निघुन गेला पण त्यानंतर माझ्या मनामध्ये एक वेगळेच काहुर उठले.
मनात विचार आला की किती सहजासहजी हा मुलगा मला माऊली म्हणुन हात देऊन त्याच्या दिशेने निघुन गेला.पण मी खरच माऊली म्हणण्यायोग्य आहे का?किंवा आपण रोज एकमेकांना साहेब,राजे,माऊली अशा शब्दांनी हाक मारतो.पण खरच आजचा माणुस स्वताला माऊली म्हणुन घेण्याच्या लायक आहे का?स्वताला राजे किंवा साहेब म्हणुन घेण्यायोग्य आहे का?अजिबात नाही तरी आपण किती सहजासहजी एकमेकांना माऊली,राजे,साहेब अशा नावाने हाक मारतो.पण आपल्याला त्याचा खरा अर्थ कळतो का?
मग माझ्या मनात प्रश्न उत्पन्न झाला माऊली म्हणजे काय?अणि आपण दैनंदिन जीवणात मायमाऊली हा जो शब्द वापरतो.त्याचा नेमका अर्थ काय?माय अणि माऊली हयादोघी एकच असतात का? का वेगवेगळया असतात?त्या दोघांमध्ये फरक काय असतो?असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
मग मला महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात बी.ए.च्या दितीय वर्षात शिकत असताना एकदा तासिकेला प्राध्यापक अर्जुन नेरकर यांनी आम्हाला शिकवत असतानाच एकदा माय माऊली हया शब्दाची सांगितलेली व्याख्या मला आठवली.प्राध्यापक अर्जुन नेरकर म्हणाले होते की माय अणि माऊली आपण हया शब्दाला एकच अर्थाने बघतो.पण त्या दोघांमध्ये खुप मोठा फरक आहे.
मग तो फरक आम्हाला समजावून सांगत असताना प्राध्यापक अर्जुन नेरकर म्हणाले होते की माय म्हणजे ती असते जी आपल्या स्वताच्या लेकराला म्हणते बाळ ऊन लागेल रे सावलीत हो.अणि माऊली ती असते जी दुसरयाच्या लेकराला म्हणते बाळ ऊन लागेल रे सावलीत हो.
तसे पाहायला गेले तर हे दोघे शब्द समानच वाटतात.पण दोघांमध्ये खुप मोठा फरक आहे तो असा आहे की जी स्त्री आपल्या पोटच्या लेकराला म्हणते बाळ तुला ऊन लागेल रे सावलीत हो.ती माय असते.कारण ती त्याची जन्मदात्री आई असते.तिने त्याला जन्म दिलेला असतो.त्यामुळे ही गोष्ट साहजिकच आहे की त्या लेकराला ऊन लागल्यावर तिच्या जीवाला घोर लागतो.त्याच्या पायाला चटके लागताना पाहुन तिच्या हदयाला त्रास होतो.कारण तो तिच्या पोटचा गोळा असतो.तिने त्याला नऊ महिने नऊ दिवस तिच्या गर्भात वाढवलेले असते.
पण जी स्त्री आपल्या पोटातुन जन्म न दिलेल्या लेकरालाही मायेने जवळ घेते.त्याच्या पायाला उन्हात उभे असताना जे चटके लागत असतात.ते चटके तिच्या हदयाला लागतात.तिला वेदना लागतात.ती स्त्री खर्या अर्थाने माऊली असते.
अणि अशी एकच माऊली मला आज सध्याच्या परिस्थितीत आठवते ती म्हणजे माझी सावित्री माऊली.जिला सर्व जग सावित्रीबाई फुले हया नावाने ओळखते,संबोधते.
ज्यांना पहिली स्त्री शिक्षिका,स्त्री हक्काच्या प्रणेत्या म्हणुन जगभर ओळखले जाते.पण आज समाजव्यवस्थेने माझ्या त्याच सावित्री माऊलीला जिने कधी जातीभेद पाळला नाही सर्व दीनदुबळयांची तिने मदत केली,अस्पृश्यांना शिकवण्यासाठी तिने स्वता अंगावर शेणा मातीचे गोळे खाल्ले अणि आज माझ्या त्याच सावित्री माऊलीला हया समाजव्यवस्थेने जाती मध्ये वाटुन टाकले.तिला फक्त माळयांपुरताच सीमीत ठेवले आहे.त्यांना फक्त एवढेच माहीत राहिले आहे की महात्मा फुले अणि सावित्रीबाई फुले हे जातीने माळी होते म्हणुन ते फक्त माळयांचेच आहे.शिवाजी महाराज हे मराठा होते म्हणून ते फक्त मराठयांचेच आहेत.बाबासाहेब जातीने महार होते. म्हणुन ते फक्त महारांचेच आहे.इतरांचा त्यांच्याशी काही संबंध नाही कारण ते आपल्या जातीचे नाही असा बघण्याचा दृष्टीकोन आज समाजाचा झाला आहे.अक्षरश ज्या स्त्रीयांसाठी सावित्रीबाई फुले झटल्या त्याच स्त्रियांना आज तिच्याविषयी दोन शब्द बोलता येत नाही.ही खरच खुप मोठी शोकांतिका आहे.अणि ही शोकांतिका मी माझ्या डोळयासमोर बघितली आहे.
झाले असे की एम ए प्रथम वर्ष मराठी मध्ये शिकत असताना आम्हाला ग्रामीण साहित्य हया विषयाला केशव गावित नावाचे प्राध्यापक होते.अणि ते एकेदिवशी अंतर्गत मुल्यमापणासाठी आमची तोंडी परिक्षा घेत होते.अणि ते माझे चांगले मित्र असल्यामुळे त्यांनी मला स्वता सर्व विदयार्थ्यांची तोंडी परिक्षा घ्यायला लावली होती.अणि हा त्यांचा मोठेपणा आहे की ते एका विदयार्थ्याला आपल्या बरोबरीने बसवुन आपल्या बरोबरीचा दर्जा देतात.हया बाबतीत मी खरच मनापासून त्यांचा खुप आभारी आहे की त्यांनी मला त्यांच्या बरोबरीचे स्थान दिले.मला त्या पात्रतेच्या योग्य समजले.कोणताही गर्व न बाळगता.असे गुरू खुप नशिबवान व्यक्तीला लाभतात.अणि तो नशिबवान मी आहे याचा खरच मनापासुन आनंद आहे मला.प्राध्यापक केशव गावित यांनी मला नेहमी एकदम मित्रासारखेच वागवले.अणि प्राध्यापक केशव गावित अणि विनोद केदारे हे माझे असे प्राध्यापक आहेत.ज्यांच्याशी मी कोणताही संकोच न बाळगता बिनधास्त बोलु शकतो.ज्यांच्यासोबत मी महाविदयालयाच्या आवारात उभा राहुन बिनधास्त सेल्फी काढायचो ते ही एकदम मित्रांप्रमाणे असे हे माझे अत्यंत आवडते अणि लाडके प्राध्यापक केशव गावित अणि प्राध्यापक विनोद केदारे.जे माझे प्राध्यापकच नाहीत तर माझे दोन असे मित्र आहेत.ज्यांच्यासोबत मी बिनधास्त थटटा मस्करी करू शकतो,माझ्या मनातील कोणतीही गोष्ट त्यांना निसंकोचपणे सांगू शकतो इतके ते माझे जवळचे आहे.असे माझे दोन मित्र.जे राम अणि शाम प्रमाणे नेहमी सोबतच राहतात.जे नेहमी माझ्याशी थटटा मस्करी करतात अणि मी ही त्यांची बिनधास्त थटटा मस्करी करतो अणि जे अधुनमधुन नेहमी मित्राप्रमाणे मला फोन करुन माझ्याशी मनमोकळया गप्पा मारतात.आपण प्राध्यापक आहे असा कोणताही अभिमान न बाळगता ते माझ्याशी एकदम मित्राप्रमाणे चेष्टा,मस्करी करतात असे हे माझे दोन मित्र म्हणजे प्राध्यापक केशव गावित अणि प्राध्यापक विनोद केदारे.एक अत्यंत मोठया मनाचे,कोणत्याही प्रकारचा गर्व न बाळगणारे,आपल्या विदयार्थ्याला नेहमी मित्राप्रमाणे वागणुक देणारे.दोन विनोदी स्वभावाचे व्यक्ती.
असो मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.अणि एकेदिवशी अंतर्गत मुल्यमापणाची चाचणी चालु असताना प्राध्यापक केशव गावित यांनी मला काही विदयार्थ्यांची तोंडी परिक्षा घेण्यास सांगितले.मग मी माझ्या वर्गातील एका मुलीला प्रश्न विचारला की सावित्रीबाई फुले यांच्याविषयी तुला काय माहीत आहे?तर तिच्या तोंडातुन ज्या माऊलीमुळे आज ती शिक्षण घेऊ राहिली तिच्याविषयी बोलायला तिच्याकडे दोन शब्दही नव्हते.हे बघून माझे मन खुप दुखी झाले होते.मग प्राध्यापक जेव्हा तिला म्हणाले तु कोणाविषयी सांगु शकते?मग ती म्हणाली मी शिवाजी महाराजांविषयी बोलु शकते.कारण ती जातीने मराठा होती म्हणुन ती शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द सांगु शकत होती.पण ज्या सावित्रीबाईंमुळे तिला समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.तिला समाजात अभिमानाने अणि स्वाभिमानाने जगता येऊ राहिले.ज्या माऊलीमुळे आज तिला शिक्षणाचा हक्क मिळाला त्या माऊलीविषयी बोलायला तिच्याकडे दोन शब्द पण नव्हते.ते पण का?तर ती विदयार्थीनी जिला सावित्रीबाईंविषयी प्राध्यापकांनी विचारले ती जातीने माळी नव्हती.म्हणुन तिच्याकडे आज त्या माऊलीविषयी बोलायला दोन शब्दही त्या विदयार्थीनीकडे नव्हते.अणि हीच आपल्या समाजात आज वावरत असलेली खुप मोठी शोकांतिका आहे.की प्रत्येकाला फक्त आपल्या जातीच्या महापुरुषांविषयीच माहीती आहे.आपल्या जातीच्या बाहेरच्या महापुरुषांविषयी बोलायला आपल्याकडे शब्दच नाहीये.ते ही का? तर तो महापुरुष,माऊली माझ्या जातीचा नाही,जातीची नाही म्हणुन ती,तो माझा नाही.म्हणुन मी त्याच्याविषयी का माहीती ठेवू?हा विचार हा दृष्टीकोन आताचा समाज मनात बाळगुन बसलेला आहे.
असो मला अजिबात कोणाला दुखवायचेही नाहीये.पण मला फक्त एवढेच सांगायचे आहे की आज ज्या स्त्रीमुळे आज सर्व स्त्रिया अभिमानाने अणि स्वाभिमानाने जीवण जगता आहे त्याच माऊली विषयी त्यांना दोन शब्द सांगता येत नाही.बोलता येत नाही. ते ही का?तर ती माऊली त्यांच्या जातीची नव्हती म्हणुन.
खरच ही खुपच दुखद गोष्ट आहे जी आज आपल्या समाजात अस्तित्वात आहे.आजही माणुस जातीमध्येच अडकून पडलेला आहे.जातीच्या पलीकडे त्याला अजिबात काही माहीत पण नाही.व त्याला काही जाणुन घ्यायची इच्छा पण नाही.ही खुपच खेदजनक बाब आहे.
अजुनही माणुस जातीतच अडकुन पडला आहे.तो जातीच्या बंधनात अडकुनच जगु राहिला.
म्हणुन माझ्या मनाला एकच प्रश्न पडतो की माणुस उच्चशिक्षण घेऊन आभाळाएवढया उंचीपर्यत पोहचू राहिला.पण अजुनही तो जाती-धर्माच्या पलीकडे अजिबात विचार करत नाहीये.
म्हणून माझ्या मनाला कधीकधी हा पण प्रश्न पडतो की माणुस आज हा विज्ञानयुगात जगतो आहे.तंत्रज्ञानामध्ये वावरतो आहे.पण अजुनही तो जातीच्या पलीकडे जायला तयार नाहीये.विचार करायला तयार नाही.
अजुनही ही जात का नाही जात आहे?