एक विचार माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.
एक विचार माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.
एकेदिवशी मी रोजप्रमाणे झोपण्याच्या अगोदर मी माझ्या मोबाईलवर आलेले संदेश वाचत होतो.त्यातच एक संदेश आला होता.माझ्या एका मित्राचा जो मी एम ए प्रथम वर्षाला ज्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात शिकत होतो.त्याच महाविद्यालयात तो बी. ए च्या दितीय वर्षामध्ये शिकत आहे.आमचे रोज एकमेकांना संदेश चालुच असतात. कसा आहेस? कस चालले आहे तुझे वगैरे वगैरे.पण एकेदिवशी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान मला त्याचा अचानक एक संदेश आला की भाऊ मला जगायची अजिबात ईच्छाच राहिली नाहीये.कारण माझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही आहे.
मी विचारातच पडलो की सकाळीच तर आमचे बोलणे झाले होते तेव्हा तर हा एकदम व्यवस्थित होता.अचानक याला असे काय झाले की याला जगायची अजिबात ईच्छाच राहिली नाही आहे.मी त्याला सांगितले काय झाले मला व्यवस्थित समजावुन सांग तु काय बोलतो आहे मला काहीच कळू नाही राहिले.त्यावर तो म्हणाला की भाऊ काही समजु नाही राहिले यार माझ डोकच चालू नाही राहिले.अस वाटत आहे की आयुष्य संपवुन घ्यावा.मग मी त्याला म्हणालो की काय झाले असे का बोलतो आहे? त्यावर तो पुन्हा म्हणाला माझा एक दिवस पण चांगला जात नाही आहे भाऊ. मग मी त्याला म्हणालो की झाले काय आहे मला नीट समजावून सांग.पण तो काहीच सांगायला तयार नव्हता.मग मीच अंदाज लावला की याला घरच्येच काही बोलले असावे. अणि माझा अंदाज खरा ठरला.मी त्याला जेव्हा विचारले की घरचे काही बोलले का? त्यावर तो हो म्हणाला.मला त्याच्या अडचणीचा थोडासा अंदाज येऊन लागला होता कारण तो माझा फार जवळचा मित्र आहे.मग मी त्याच्या मनातील काढायला सुरुवात केली.
अणि मी त्याला अजुन एक प्रश्न विचारला की घरचे तु काम करत नाही त्याबद्दल तुला काही बोलले का?तो पुन्हा हो म्हणाला.आता मला त्याची पुर्ण समस्या लक्षात आली होती की त्याला नेमक झाले काय आहे? पण मला त्याच्याकडून खर ते जाणुन घ्यायचे होते.मग मी विचारल्यावर तो मला सांगू लागला की वीजेच बील ह्यावेळी खूप जास्त आले अणि त्यामुळे घरचे चिडचीड करु राहिले.त्यात माझी घरची परिस्थिती कशी आहे तुला तर सगळे माहितच आहे माझे वडील वायरमनचे काम करतात जिथे काम असेल तिथे जातात,मोठा भाऊ सेंट्रिंग कामाला जातो अणि आई लोकाच्या घरी धुणीभांडी करती.योगेश भाऊ घरचे म्हणता आहे काम कर आणि मी करायला पण तयार आहे पण मी एका हाताने अपंग आहे त्यामुळे मला कोणी कामावर घ्यायलाच तयार होत नाही आहे.लोकांना कामासाठी चांगला मुलगा लागतो दोन्ही हात चांगले असलेला अणि माझा एक हात मोडेल असल्यामुळे मला कोणी कामावरच घेत नाही आहे भाऊ.मी काय करु मला काहीच कळू नाही राहिले?
मग मी त्याला समजावुन सांगितले की कोण म्हणे शारिरीक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कोणी कामावर घेत नाही.शोधशील तर भेटेल तुला पण काम.पण तो एकच गोष्ट लावुन धरत होता की माझा एक हात मोडेल मला कोण काम देईल?त्याच्या बोलण्यावरून मला कळत होते की तो पुर्ण नैराश्याने ग्रस्त झाला होता.पण ते म्हणतात ना कधी कधी आपल्या नकळत आपण कुणाचे तरी भले करुन टाकतो पण ते आपल्यालाच कळत नाही की आपल्यामुळे कोणाचे तरी भले झाले आहे असाच अनुभव मला पण आला.जेव्हा माझा मित्र फार निराश झाला होता.त्याने जगण्याची ईच्छाच सोडुन दिली होती.
पण तेव्हा मी त्याला एक शब्द बोललो की जे नाही त्याच दुख करत बसण्यापेक्षा जे आपल्या हातात आत्ता आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेणे ते करणे कधीही चांगले.माझ्या हया एका शब्दाने त्याला जगण्याची एक नवीन आशा मिळाली.तो मला म्हणाला की भाऊ मला हीच एक गोष्ट फार अडचणीत टाकत होती. पण मला वाटते आहे की मला माझे उत्तर मिळाले आहे.त्यावर मी त्याला म्हणालो की तुला पुन्हा काहीपण अडचण आली तर निःसंकोचपणे मला सांग मी नक्की तुला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.
अणि सध्या कोरोनामुळे कामधंदा व्यवस्थित चालू नाही त्यामुळे घरात पैशाची अडचण ही येतेच त्यामुळे बोलले असतील घरचे दोन शब्द ताणतणावात त्याच एवढ मनाला लावून नको घेऊ.अणि पुन्हा अस जीव देण्याचा विचार मनात आणु नको.त्यावर तो म्हणाला की बरोबर आहे भाऊ माझ्या घरचे फार चांगले आहेत ते मला खूप जीव लावतात.मला फार सांभाळुन घेतात.रागाच्याच भरात बोलले असतील ते मी एवढ मनाला लावायला नको होते.
माझा हा मित्र फार महत्वाकांक्षी आहे.त्याला कलेक्टर बनायच आहे.पण घरची आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक अपंगत्वामुळे तो कधी कधी फार खचून जातो.
खरे पाहायला गेले तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचे निराशेचे प्रसंग हे येतच असतात.पण याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यच संपवून घ्यायचे.त्याच्यातुन बाहेर पडण्यासाठी आपण योग्य तो मार्ग शोधला पाहिजे.अडचणी तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात पण जो त्यांच्यावर मात करून पुढे जातो तोच खरा खेळाडू असतो.
मैत्री म्हणजे दुसरे काय असते एक बुडत असला तर दुसर्याने त्याला हात द्यायचा मी ही तेच केल.पण एक गोष्ट मला हया प्रसंगातून चांगली लक्षात आली की विचार हे माणसाचे आयुष्य बदलून टाकतात.त्याच्यामध्ये जगण्याची नवीन उमेद निर्माण करतात.
एक विचार माणसाचे संपुर्ण आयुष्य बदलून टाकतो.
-योगेश सोनवणे