मनाचा मोठेपणा

*मनाचा मोठेपणा* 

     मनाचा मोठेपणा हा शब्दही माझ्या तोंडावर कधी चुकुन आला तर मला दोन व्यक्तींची पहिले आठवण येते ते म्हणजे माझे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील जुने प्राध्यापक गजानन भामरे.अणि प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे ज्या नाशिक जिल्हयातील एक प्रसिदध लेखिका आहेत.अणि माझ्या मनामध्ये लिहिण्याची आवड त्यांनीच निर्माण केली.अणि असे म्हणायलाही मला तरी काहीच हरकत वाटत नाही की आज माझी लेखक म्हणुन जी जडणघडण झाली आहे त्यात पहिला वाटा त्यांचाच आहे.त्यांनीच मला लिहायला प्रवृत्त केले.
     अशा हया प्राध्यापक गजानन भामरे अणि प्राध्यापिका,लेखिका विदया सुर्वे बोरसे हया महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील होऊन गेलेल्या अत्यंत मोठया मनाच्या दोन व्यक्ती.
        प्राध्यापक गजानन भामरे हे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील अत्यंत अनूभवी प्राध्यापक होते.अणि एकदम मोठया मनाचा माणुस.आजही मी त्यांना व्हाँटस अँपवर संदेश पाठवला तर ते मला अक्षरश आहोजाहो करतात.ते जेव्हा मला आहोजाहो करतात तेव्हा मलाच थोड अवघडल्यासारखे वाटायला लागते.की एवढे मोठे प्राध्यापक मला अक्षरश आहोजाहो करु राहिले.हयावरुन कळुन येते की ते मनाने किती मोठे आहेत.ते आपल्या विदयार्थ्याला सुदधा आहोजाहो करतात.कधीच मला त्यांनी शब्दानेही दुखावले नाही.अणि मला काहीही समस्या असली तर मी निसंकोच त्यांना जाऊन सांगायचो अणि त्यांनी मला मदत करायला कधीच माझा कंटाळा केला नाही.आता त्यांची बदली देवळयाला झाली आहे.पण अजुनही महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात मला काहीही समस्या असली तर मी त्यांना फोन करुन निसंकोचपणे सांगतो अणि ते मला योग्य तेच मार्गदर्शन करतात.ते मला कधीच असे म्हणाले नाही की मी आता तिथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत नाहीये त्यामुळे मला काही विचारू नका.उलट ते मला योग्य तेच मार्गदर्शन करतात.अणि त्यांनी कधीच माझा कंटाळा केला नाही.
      आता काही दिवसांपुर्वीच मी त्यांना व्हाँटस अँपवर संदेश पाठवला की माननीय प्राध्यापक महोदय मला एम.ए च्या द्दितीय वर्षासाठी औरंगाबादच्या महाविदयालयात प्रवेश घ्यायचा आहे.पण महाराजा सयाजीराव गायकवाड  महाविदयालयातील क्लार्क हे माझा दाखला देण्यास स्पष्ट नकार देऊ राहिले.ते म्हणता आहे की जोपर्यत निकालाची सत्यप्रत मिळत नाही.तोपर्यत आम्ही तुला तुझा दाखला तुझ्या हातात देऊ शकत नाही.तेव्हा मी काय करु?जर मी लवकर एम.ए च्या दुसरया वर्षात प्रवेश नाही घेतला तर वेळेत प्रवेश न घेतल्यामुळे माझे वर्ष वाया जाईल.अणि जोपर्यत मला महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातुन माझा दाखला प्राप्त होत नाही.तोपर्यत मी दुसरीकडे प्रवेशही घेऊ शकत नाही.अणि त्यातच महाविदयालयातील ग्रंथालयातील सर हे नीट व्यवस्थित स्पष्टपणे निश्चित असे सांगुही नाही राहिले की निकालाच्या सत्यप्रती महाविदयालयातुन आम्हाला केव्हा वितरीत केल्या जातील.अणि माझी अजिबात ईच्छाच नाहीये प्राध्यापक महोदय दुसरया वर्षासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात प्रवेश घेण्याची.अशा परिस्थितीत मी काय करु प्राध्यापक महोदय तुम्हीच मला योग्य ते मार्गदर्शन करा.मी खुप गोंधळलो आहे.
      तेव्हा प्राध्यापक गजानन भामरे मला म्हणाले की सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच शैक्षणिक,महाविदयालयीन कामकाज ठप्प झाले आहे.त्यामुळे सध्यातरी लगेच निकालाची सत्यप्रत मिळणे शक्य नाही.निकालाची सत्यप्रत मिळण्यासाठी तुम्हाला शक्यता कमीत कमी एक दोन महिने तरी वाट पाहावीच लागेल.त्यामुळे तुम्ही निकालाची वाट पाहत बसुन स्वताचे वर्ष वाया घालवु नका.इथेच प्रवेश घेऊन टाका.अणि अभ्यासाला लागा.अणि काहीही मदत लागली तर निसंकोचपणे मला सांगा.अणि असा अटटहास करत बसु नका की मला महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात एम.ए च्या द्दितीय वर्षासाठी अजिबात प्रवेश घ्यायचाच नाही.कधी कधी आपल्याला परिस्थितीनुसार जूळवुन पण घ्यावे लागते.म्हणून इथेच महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात प्रवेश घेऊन टाका.अणि नियमितपणे अभ्यासाला लागा.
     मग प्राध्यापक गजानन भामरे यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर मी शेवटी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातच एम.ए मराठीच्या द्दितीय वर्षासाठी प्रवेश घेण्याचे ठरवले.जर प्राध्यापक गजानन भामरे यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले नसते तर कदाचित मी आवेशात येऊन एक वर्ष एम.ए ला गँप देण्याचाच विचार करत होतो.कारण महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील क्लार्क हे माझा दाखला निकालाची सत्यप्रत आल्याशिवाय द्यायला काही तयार होत नव्हते.म्हणुन मी एक वर्ष गँप देण्याचाच विचार करत होतो.
   पण प्राध्यापक गजानन भामरे यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे मी माझा निर्णय बदलला अणि एम ए मराठीच्या द्दितीय वर्षासाठी मी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातच प्रवेश घेण्याचे ठरवले.
        अशाप्रकारे प्राध्यापक गजानन भामरे यांनी मला योग्य त्या पदधतीने समजावून सांगितल्यामुळे,मार्गदर्शन केल्यामुळे मी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात द्दितीय वर्षासाठी प्रवेश न घेण्याचा माझा अटटहास सोडला.अणि इथेच प्रवेश घेण्याचे ठरविले.
      असे आहेत आमचे प्राध्यापक गजानन भामरे आपल्या विदयार्थ्यालाही मानपान देणारे.आपल्या विदयार्थ्याला नेहमी सहकार्य करणारे.कधीही त्याचा कंटाळा न करणारे.नेहमी त्याला योग्य तेच मार्गदर्शन करणारे.एक अत्यंत मोठया मनाचा माणुस.जो कधीच कोणाला छोटा समजत नाही.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.