माझ्या आयुष्यातील पहिली वेबिनार मिटिंग

माझ्या आयुष्यातील पहिली वेबिनार मिटिंग

   काल अचानक एम ए मराठीच्या गटावर एका वेबिनार मिटिंगमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्राध्यापक नाना घुगे यांनी 
सर्व विदयार्थ्यांना सांगितले.मी तात्काळ लगेच गटामध्ये समाविष्ट होण्यासाठी जी व्हाँटस अँप लिंक प्राध्यापक नाना घुगे यांनी एम ए च्या गटावर दिली होती तिच्यावरुन केबी-एच वेबिनार नावाच्या व्हाँटस अँपच्या गटावर समाविष्ट झालो.व मिटिंग आयडी टाकुन वेबिनार मिटिंगमध्ये पण मी लगेच समाविष्ट झालो.
   हा माझ्या आयुष्यातील पहिलाच वेबिनार होता.हया आधी मी कोणत्याही वेबिनार मिटिंगमध्ये कधीच समाविष्ट झालो नव्हतो.म्हणुन मनात खुप उत्सुकता होती की कशी असते ही वेबिनार मिटिंग.वेबिनार मिटिंगचा आयडी टाकल्यावर सुरुवातीलाच मला तिथे मिटिंगमध्ये माझे सगळयात आवडते प्राध्यापक अर्जुन नेरकर दिसले.ज्यांचा मी मराठी विभागातील खुप लाडका विदयार्थी होतो.ते मराठी भाषा अणि त्यात असलेल्या रोजगाराच्या संधी हया विषयावर सगळया विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.अणि सदर वेबिनार मिटिंगचे आयोजन त्यांनी व त्यांच्या इतर सहकार्यानीच केले होते.
     मग प्राध्यापक अर्जुन नेरकर यांनी सर्व विदयार्थ्यांना सांगत होते की तुम्ही मराठीमध्ये शिक्षण घेऊन सुदधा वेगवेगळया क्षेत्रात स्वताला घडवु शकतात.असेच नाही की एम ए मराठी किंवा मराठीत उच्च शिक्षण केल्यानंतर तुम्ही फक्त शिक्षक किंवा प्राध्यापकच बनु शकता.तुमच्यासाठी वेगवेगळया संधी आहेत मराठीत शिक्षण केल्यानंतर अणि त्याच संधीविषयी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही ही वेबिनार मिटिंग आयोजित केली आहे.ज्यात लेखिका वर्षा तोडमल हया तुम्हाला सर्व विदयार्थ्यांना मराठी भाषा अणि त्यात असलेल्या रोजगाराच्या संधी हया विषयावर आज मार्गदर्शन करणार आहेत.
      मग प्राध्यापक अर्जुन नेरकर यांनी वेबिनार मिटिंगचे सुत्रे कल्याण कोकणे यांच्याकडे सोपवली.मग त्यांनीही त्या विषयावर विदयार्थ्यांना थोडे मार्गदर्शन केले अणि मग त्यांनी लेखिका वर्षा तोडमल हयांना विदयार्थ्याना मराठी भाषा अणि त्यात असलेल्या रोजगाराच्या संधी हया विषयावर मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले.
     मग लेखिका,कवियित्री वर्षा तोडमल यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज मराठीमध्ये शिक्षण करुन सुदधा तुम्ही सर्वजण वेगवेगळया क्षेत्रामध्ये स्वताला घडवू शकतात.असे काही नाही की मराठीत शिक्षण करणारा विदयार्थी हा बनला तर फक्त शिक्षक किंवा प्राध्यापकच बनू शकतो.तुम्ही मराठीमध्ये शिक्षण करुन वेगवेगळया कला आत्मसात करु शकतात.जसे की तुम्ही चित्रपट संहिता लेखन करु शकता.चित्रपटाच्या पटकथा लेखन करु शकता त्यातही तुम्हाला करिअरच्या खुप संधी आहेत.अणि मग चित्रपट सृष्टीतील करिअर विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सैराट चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक नागराज यांचे उदाहरण देताना सांगितले की नागराज यांनी त्यांचे एम.ए अणि एम.फिल मराठीतुनच केले अणि चित्रपटसृष्टीत त्यांनी पर्दापण केले अणि बघा आज ते किती मोठे निर्माता दिग्दर्शक म्हणुन प्रसिदध आहे.तुम्ही पण एक चांगला पटकथालेखक,निर्माता,दिग्दर्शक इत्यादी म्हणुन चित्रपटसृष्टीत स्वताला घडवु शकतात.अणि पटकथालेखनाविषयी बोलताना त्यांनी प्रविण दवणे यांचेही उदाहरण दिले.
     एवढेच नाहीतर तुम्ही वृतपत्रसृष्टीत एक पत्रकार,संपादक,मुद्रितशोधक,भाषांतरकार,अनुवादक,बातमीलेखक,स्तंभलेखक इत्यादी म्हणुन काम करु शकतात.
    अणि त्या हे सुदधा म्हणाल्या की खुप विदयार्थी हे एम ए किंवा बी.ए नंतर स्पर्धा परिक्षेकडे वळतात त्यांना सुदधा आता मराठीचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे.कारण स्पर्धा परिक्षेत सुदधा मराठीला खुप महत्व प्राप्त झाले आहे.त्यातही मराठी साहित्य अणि व्याकरण हयावर हमखास प्रश्न विचारले जातात.त्यामुळ आता स्पर्धा परिक्षेसाठीही मराठीचा अभ्यास करणे गरजेचे झाले आहे.
    त्याचबरोबर जर तुमची भाषेवर चांगली पकड असेल व तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही लेखक म्हणुन सुदधा करिअर करु शकतात.लेखकांविषयी बोलताना त्यांनी भालचंद्र नेमाडे यांचे उदाहरण दिले.त्यातही खुप प्रकार आहेत.तुम्ही वृतपत्रात लेख लिहु शकतात,वेगवेगळया साहित्यप्रकारात लेखन करु शकता.उदा कथा,कादंबरी,नाटक इत्यादी.त्याचबरोबर तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग,ब्लाँगिंग,कंटेंट रायटिंग करु शकतात.त्याचबरोबर चित्रपट,मालिका,दुरचित्रवाणी,वेब सीरीज या माध्यमांसाठी पण लेखन करु शकतात.
    त्याचबरोबर तुम्ही एक चांगले व्याख्याता,प्रवचनकार,किर्तनकार,समुपदेशक,मार्गदर्शक इत्यादी म्हणुनही करिअर करु शकतात.तसेच तुमच्यामध्ये संवाद कौशल्य चांगले असेल तर तुम्ही जनसंपर्क अधिकारी म्हणुन सुदधा काम करु शकतात. 
     अशाप्रकारे अशी खुप काही करिअरसाठी त्यांनी विदयार्थ्यांना क्षेत्रे सांगितली.अणि आपण आपल्या मातृभाषेतही किती मोठे होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले.पण एवढे सर्व सांगत असताना मध्येच काही विदयार्थी गोंधळ घालत होते.अजून किती वेळ चालेल हे? संपवा ना आता अशी मागणी करत होते.तसेच अधुनमधुन वायफळ बडबड करत होते.म्हणुन त्यांना थोडक्यात त्यांचे बोलणे आवरावे लागले.
    ही अशी होती माझ्या आयुष्यातील एक तास चाललेली ही पहिली वेबिनार मिटिंग.
    अशाप्रकारे खुपच छान मार्गदर्शन केले लेखिका वर्षा तोडमल यांनी सर्व विदयार्थ्यांना पण काही विदयार्थी मधीच बोलुन गोंधळ घालत होते.बाकी वेबिनार खुपच छान होता.मराठी मध्ये करिअरच्या किती निरनिराळया संधी आहेत हे मँडमांनी सांगितले.अणि मराठी माणुस कुठेच कमी नाही फक्त त्याने आपल्या भाषेतील निरनिराळया कला आत्मसात केल्या पाहिजे हे पण मँडमांनी सांगितले.मँडमांच्या हया वेबिनारमुळे मला तरी खुपच ज्ञान मिळाले.खुप काही करिअरच्या संधी कळाल्या.
   अणि आजच्या हया वेबिनार मिटिंगमधुन मला एक गोष्ट पण चांगली लक्षात आली की आजचा विदयार्थी हा आँनलाईन शिक्षणासाठी मानसिकदृष्टया पुर्ण तत्पर नाहीये.त्यामुळे तो आँनलाईन शिक्षणाचा कंटाळा करतो आहे.एक तासाची वेबिनार मिटिंग सुदधा तो शांतपणे ऐकु शकत नाही?.मग हयावरुन कळुन येते की तो किती आँनलाईन शिक्षणासाठी मानसिकदृष्टया तयार आहे.
    हयावरुन भारत सरकारने,शिक्षण विभागाने निष्कर्ष काढावा की त्यांनी सुरू केलेली आँनलाईन शिक्षण पदधत किती यशस्वी ठरणार आहे?.अणि कुठपर्यत यशस्वी ठरणार आहे?.अणि हया आँनलाईन शिक्षण पदधतीला विदयार्थी किती प्रतिसाद देणार आहे?.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.