जे काही घडते चांगल्यासाठीच घडते
समजा एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तु तुम्हाला मनापासून आवडत असेल पण ती तुम्हाला अजिबात मिळत नाही. खुप प्रयत्न करुण सुदधा तुम्हाला ती मिळत नसेल तेव्हा वाईट वाटुन घेऊ नका कारण परमेश्वराने तुमच्या आयुष्यात त्या व्यक्ती किंवा वस्तुपेक्षा अधिक चांगली व्यक्ती किंवा वस्तु येण्याचे ठरविलेले असते. म्हणून ती व्यक्ती किंवा वस्तू तुम्हाला मिळत नसते.
म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यात जे काही घडत असते ते विनाकारण घडत नसते. त्यामागे एक कारण असते जे आपल्याला समजून घेता आले पाहिजे.आपल्या आयुष्यात जे काही घडत त्यातुन काहीतरी चांगलेच होणार असते. फक्त ते आपल्याला समजून घेता आले पाहिजे. वाईटामध्ये सुदधा काहीतरी चांगले दडलेले असते फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजे.