मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना
मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी बी.ए च्या पहिल्या वर्षात शिकत होतो.तसे पाहायला गेले तर मला जास्त कोणाशी बोलण्याची अजिबात सवय नाही.अणि मी माझा जास्तीत जास्त वेळ वाचणात अणि लेखणातच घालवतो.अणि लहानपणापासुनच मला एकटे राहायला खुप आवडते.अणि माझ्याजवळ विनाकारण कोणी गर्दी केलेली मला आवडतही नाही.अणि मी गर्दीच्या जागी थांबत पण नाही.लगेच तिथुन पळ काढत असतो.कारण मला जास्तीत जास्त एकांतातच राहायला आवडते.तसेच अनोळखी व्यक्तींशी बोलायलाही मला जास्त आवडत नाही.त्यामुळे मी बी.ए च्या पहिल्या वर्षात जेव्हा शिकत होतो.तेव्हा माझी कोणाशी खास मैत्रीही नव्हती झाली.अणि मी नेहमी माझा माझा एकटाच राहायचो.
पण एकेदिवशी महाविदयालयात माझी ओळख काही मुलांशी झाली.त्यांचे नाव होते.राहिल शेख,मुदस्सीर,आरीफ,झाकीर असे त्यांचे नाव होते.नावावरुनच कळुन येईल की ते मुस्लिम धर्मीय होते.पहिल्याच भेटीत आमची खुपच चांगली मैत्री झाली.अणि सगळयात आश्चचर्याची बाब अशी की ते चारही जण सोबतच राहायचे.त्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणी मला त्यांच्यात दिसायचेही नाही.कारण त्यांचा चारही जणांचा निश्चित गट होता.त्यात ते इतर कोणाला समाविष्ट करायचे पण नाही.अणि इतर कोणामध्ये जायचे ही नाही.त्यातच त्यांच्या मनात हिंदुविषयी असलेली वैरत्वाची,द्वेषाची भावना अणि त्यांच्या मनात समाजव्यवस्थेने पेरलेले विष हयामुळे ते माझ्याशीही मी हिंदु असल्यामुळे सुरुवातीला तुटकच वागायचे.सुरुवातीला मला जास्त त्यांच्यात समाविष्टही ते करायचे नाही.पण जस जसा आमचा परिचय वाढत गेला.तसतशी आमच्यामधली ही धर्म नावाची जी दरी निर्माण झाली होती.ती कमी होत गेली.अणि मग त्यांनी मलाही त्यांच्यात समाविष्ट करून घेतले.
अणि सुरुवातीला ते माझ्याशी हयामुळे तुटक वागायचे की मी धर्माने हिंदु अणि ते मुसलमान होते.अणि हिंदु अणि मुसलमान यांच्यात धर्माच्या नावाखाली कसे दंगे होतात,झगडे होतात हे मी तुम्हाला सांगायची काहीच आवश्यकता नाही.कारण आपल्या सगळयांनाच माहित आहे की मुसलमानांची जीवणपदधत ही हिंदुंच्या जीवणपदधतीच्या एकदम विरोधात आहे.मुसलमान हे गायांची,बैलांची तस्करी,कत्तली करतात त्यांचे मांसही खातात.अणि कुठेतरी ते असेही म्हणतात की ते त्यांच्या धर्मात लिहिले आहे म्हणुन ते असे करतात.पण मला कधी कधी हा पण प्रश्न पडतो की जगातील हा असा कोणता धर्म आहे जो निष्पाप,निरागस प्राण्यांची हत्या करायला सांगतो.कुठेतरी माणसानेच हया पदधती रूढ केल्या आहेत.स्वताच्या ईच्छा,अपेक्षा धर्माच्या नावाखाली पुर्ण करुन घेण्यासाठी.अणि त्यातच हिंदु हे गायीला देव मानतात.तेहतीस कोटी देवता तिच्यात वास करता असे ते मानतात.त्यामुळे हिंदु हे गायी,बैलांच्या कत्तलींना विरोध करतात.त्यामुळे हिंदु अणि मुसलमान यांच्यात मालेगावात वादही होतात धर्माच्या नावाखाली.
अणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या मनात कुठेतरी हा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे की आज हिंदुंमुळेच त्यांचा मुस्लिम समाज शिक्षणाच्या,आर्थिक स्थिती इत्यादी सर्व बाबतीत आज पिछाडीवर आहे.कुठेतरी आज हिंदुमुळेच आम्ही मागे आहोत,मागासलेले आहोत,आमची पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही,हिंदु धर्मीय लोक आमच्यावर अन्याय करतात.म्हणुन आज मुस्लिम समाज हिंदुंचा द्वेष करताना दिसुन येतो आहे.हिंदुंनी आमच्या धर्मातील लोकांच्या हत्या केल्या.आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न केला हा गैरसमज
आज त्यांच्या मनात निर्माण झालेला आपणास दिसुन येतो.म्हणुन आज हिंदु अणि मुस्लिम धर्मियांत एक सामाजिक तेढ निर्माण झालेली आपणास अजुनही दिसुन येते.म्हणुन मुस्लिम धर्मीय लोक हिंदुंचा द्वेष करताना आपणास दिसुन येते.
अणि जो गैरसमज मुस्लिम धर्मियांच्या मनात हिंदुंविषयी आहे.तोच गैरसमज हिंदुंच्याही मनात मुस्लिम धर्मियांविषयी ठासुन भरलेला आपणास दिसुन येतो.म्हणुन हिंदुही मुस्लिमांचा द्वेष करताना दिसुन येतात.हिंदु म्हणतात आम्ही गायीला गोमाता म्हणतो.अणि हे मुस्लिम तिचीच हत्या करतात.त्यांना कत्तलीसाठी घेऊन जातात.म्हणजे मुसलमान आमच्या धर्माची पायमल्ली करतात.अणि शिवाय आमच्या हिंदु लोकांनाही यांनीच खुप त्रास दिला आहे.मुस्लिम धर्मीय आमच्यावर अन्याय करतात.अशी हिंदुंची समज आहे.अशाप्रकारे दोन धर्म एकमेकांचे वैरी झाल्याचे दिसुन येते.अणि दुख हया गोष्टीचे वाटते हे तेच लोक करताना दिसुन येतात जे स्वताला विविधतेत एकता असलेल्या भारतभुमीचे नागरीक म्हणुन घेतात.कुठेतरी आज धर्मनिरपेक्षता ही आज नावालाच उरलेली आपणास दिसुन येते.
असो ही स्वाभाविकच गोष्ट आहे की प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असतो.अणि तो असायलाच हवा.त्यात काहीच चुकीचे नाहीये.पण एवढाही अभिमान नसावा की त्या अभिमानापायी माणुसच माणसाच्या जीवावर उठेल.धर्माच्या नावाखाली एकमेकांची हत्या करेल.धर्म हा माणसाने निर्माण केला आहे.स्वतासाठी,स्वताच्या सोयी सुविधेसाठी.धर्माने माणसाला निर्माण केले नाहीये.हे माणसाला कधी कळणार कोणास ठाऊक.धर्माची स्थापणा ही माणसासाठी करण्यात आली आहे.पण आज ज्या पदधतीने धर्माच्या नावाखाली माणुस माणसाचा शत्रु होत चालला आहे.एकमेकाच्या जीवावर उठतो आहे ते बघुन तर मला आता असे वाटायला लागले आहे धर्म माणसासाठी नाही तर माणुसच धर्मासाठी होत चालला आहे.
असो ज्याची त्याची जीवण जगण्याची आपापली एक पदधत आहे.त्यात मी कोणाला बोलुन कशाला माझे तोंड वाईट करुन घेऊ.कारण आपली समाज व्यवस्था अशी आहे इथे एखादया लेखकाने काही चांगले सांगितले तर लोक त्याचाच विरोध करतात.एवढेच काय तर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप त्याच्यावर केले जातात.अणि त्याच्या लिहिण्यावरच बंदी आणतात.पण त्याला काय सांगायचे आहे हेच कोणी समजुन घेत नाही.फक्त विरोध म्हणुन विरोध करायचा.तो असे का बोलतो आहे? त्याचा त्यामागचा दृष्टिकोनच कोणी समजुन घ्यायला तयार होत नाही.ही खूप मोठी शोकांतिका आहे.
असो म्हणुन मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.राहिल,झाकीर,आरीफ,मुदस्सीर यांच्यामध्ये मी दिवसेंदिवस मिळाय मिसळायला लागलो होतो.आम्ही महाविदयालयात तासनसास गप्पा मारायचो.एवढेच काय तर महाविदयालय सुटल्यानंतरही आम्ही म.स.गा महाविदयालयाच्या पटांगणात बसुन खुप वेळ गप्पा मारत बसायचो.कधीकधी मस्करीत आरीफ मला असे काही बोलुन जायचा की माझ्या खुपच मनाला लागुन जायचे.पण मी काही त्याच्याकडे जास्त लक्ष दयायचो नाही.कारण मला जेव्हा तो मला माझे मन दुखावेल असे काही नकळत बोलुन जायचा तेव्हा मला मी गिरिजा कीर यांच्या एका लेखातील वाचलेली एक ओळ डोळयासमोर यायची,आठवायची की माणसे वाईट कधीच नसतात परिस्थिती त्यांना तसे बनवत असते,वागायला विवश करत असते.मग माझ्या मनात त्याच्याविषयी आलेला राग लगेच निघुन जायचा.मग मी स्वताशीच म्हणायचो तो वाईट नाहीये परिस्थितीने त्याला जे अनुभव दिले त्यामुळे तो असा वागत असेल.त्याची बिचार्याची तरी त्यात काय चुक जे त्यानी अनुभवले तेच तो बोलतो आहे.
नंतरुन काही दिवसांनी आरीफलाच त्याच्या चुकीची जाणीव झाली की तो जसे माझ्याशी वागायचा,बोलायचा हे अतिशय चुकीचे आहे.मग त्याने स्वता माझी माफी मागितली.तो म्हणाला योगेश माफ कर मेरे भाई मे मजाक मजाक मे जो भी बुराभला बोल गया इसलिए मुझे दिलसे माफ कर दे मे दुबारा ऐसा नही करूँगा तुझे बुरा तो नही लगा ना मेरे भाई?.तसे पाहायला गेले तर आरीफ जेव्हा माझी चेष्टा करायचा.तेव्हा झाकीर त्याची चांगलीच कान उघडणी करायचा.मग आरीफ शांत बसुन जायचा.झाकीर त्या सगळयांमध्ये खुप हुशार,अभ्यासु अणि समजदार प्रवृत्तीचा होता.जेव्हा आमच्यात कोणी चुकीचे वागत,बोलत असेल तर त्याला बोलुन लगेच तो सरळ करुन टाकायचा.अणि त्याची जाणीवही करून द्यायचा की तो कुठे चुकतो आहे?.
अशा पदधतीने आमचे महाविदयालयाचे दिवस खुप आनंदात पार पडत होते.पण अचानक बी.ए च्या पहिल्या वर्षाच्या परिक्षा पार पडल्यानंतर,अणि त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर मी डिप्लोमाला चाललो गेलो.तशी माझी अजिबात ईच्छा नव्हती डिप्लोमाला घ्यायची.पण घरच्यांपुढे काहीच अपील करता येत नव्हती.घरच्यांनी शेवटचा निर्णय घेऊन टाकला होता की मला डिप्लोमाला टाकायचेच.
मग बी.ए चे पहिले वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर मी डिप्लोमाला चाललो गेलो.अणि राहिल शेख पण सौदी अरबला हाँटेल मँनेजमेंटच्या कोर्ससाठी निघुन गेला.मग महाविदयालयात फक्त आरीफ,मुदस्सीर,झाकीर हेच राहुन गेले.मग एम ए पुर्ण केल्यानंतर त्यांनी पण महाविदयालय सोडुन दिले.एम. ए पुर्ण केल्यानंतर झाकीर एका शाळेत तात्पुरता स्वरुपावर शिक्षक म्हणुन लागुन गेला.अणि आरीफ व मुदस्सीर हे एका गँरेजमध्ये कामाला लागुन गेले.अशाप्रकारे आम्ही सगळे मित्र वेगवेगळे झाल्याने एकमेकांपासुन दुर होऊन गेलो.
अणि जेव्हा आम्ही सगळे वेगवेगळे होत होतो.तेव्हा आरीफ,मुदस्सीर,राहिल,झाकीर हे मला पुन्हा पुन्हा एकच म्हणत होते.अब कब मिलना होगा सबका कुछ पता नही अब हम सब सीधा योगेश की शादी मे मिलेंगे.मग सगळे बोलायला लागले योगेश तु हमे तेरी शादी मे बुलाएगा ना? भुल नही जाएगा ना हमे?
मग त्यानंतर आमची तीन वर्ष भेट पण झाली नाही.अणि मोबाईलवर बोलायची गोष्ट तर दुरचीच होती कारण मी तेव्हा मोबाईल वापरायचोच नाही.म्हणुन मग त्यांनीही मला त्यांचे नंबर दिले नाही.
अणि एकेदिवशी जेव्हा मी एम ए च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात शिकत होतो.तेव्हा अचानक माझी भेट महाविदयालयात झाकीर अणि आरीफ यांच्याशी झाली.त्यांना डबल एम ए करायचे होते.त्यासाठी ते अँडमिशन घ्यायला आले होते.मी त्यांना लगेच ओळखुन घेतले अणि मग त्यांनी मला विचारले योगेश अभी तक भूला नही तु हमे?हमे लगा तुझे हमारे चेहरे भी याद नही होंगे.अच्छा बता तो हमारा नाम क्या है?मी त्यांची नावे लगेच सांगितली की तु झाकीर और तु आरीफ है बराबर?मग ते ही म्हणाले वाह यार अभी तक नही भुला हमको.मग आम्ही तीन वर्षांनी भेटलो असल्यामुळे आम्ही खुप मनमोकळया गप्पा मारल्या.अणि मग आरीफने माझ्यासोबत एक फोटो काढला अणि तो त्याने राहिल शेखला पाठवला.जो तेव्हा सौदी अरबमध्ये होता.मग राहिलनेही फोटो बघुन मला चटकन ओळखले की ये तो योगेश है.
मग राहिल त्याला म्हणाला कब और कहाँ मुलाकात हुई तुम्हारी उससे?मग आरीफनेही सांगितले की मै एम एस.जी काँलेज को आया था वही मुलाकात हुई उसके साथ.वो यहाँ एम ए मराठी मे कर रहाँ है.अभी अभी मुलाकात हुई मेरी.उसने अपना नंबर भी दिया है मुझको.और हम सबके नंबर भी लिए है.मग राहिल म्हणाला मै अभी काम मे हूँ थोडा.तू मुझे योगेशका व्हाँटस अँप नंबर भेज मे बादमे उसको काँल करूँगा.आरीफ बोलला ठिक है चलेगा भेजता हूँ.
मग सगळयांचे नंबर घेतल्यावर मीच एक व्हाँटस अँप वर गट बनवला.अणि त्यात सगळयांना समाविष्ट केले.मग आम्हाला जसजसा वेळ भेटायचा तसतसे आम्ही एकमेकांशी
गटावर गप्पा मारायचो.कधी हप्त्यातुन एकदा तर कधी कधी महिन्यातुन असे आम्ही एकमेकाशी व्हाँटस अँपच्या गटावर गप्पा मारायचो.
मग नंतरुन नंतरुन सगळे आपापल्या कामात,वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असल्यामुळे चार पाच महिने आमचे गटावर बोलणेच बंद झाले होते.मला वाटले कदाचित सगळे मला विसरले असतील?पण असे काहीच नव्हते.
जेव्हा मार्चपासुन एप्रिल,मे,जुन,जुलै,महिन्यात मालेगावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच होते.व कोरोनामुळे लोक मृत्युमुखी पडत होते.तसेच असेही म्हटले जात होते की मुसलमान लोक भाज्यांना थुका लावुन हिंदुंना देऊ राहिले,त्यांच्यावर पाण्याच्या गुळण्या फेकता आहे.म्हणुन कोणत्याच हिंदुने मुसलमानांकडुन काहीच विकत घेऊ नका असे विडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर पसरवले जात होते.
तेव्हाच एकेदिवशी मला राहिल शेखचा व्हाँटस अँपला संदेश आला.जेव्हा त्याने संदेश पाठवला तेव्हा तो सौदी अरबमध्येच होता.तो म्हणाला योगेश कैसा है भाई तु?तबीयत ठिक है ना तेरी?मालेगाव मे कोरोना के मरिज दिनबदीन बढते ही जा रहे है.इसलिए तू अपणा ख्याल रख.ज्यादा भीडभाड वाली जगह पर मत जा और अपने अम्मी और अब्बुका और सारे घरवालोका भी ख्याल रखा कर.
त्यादिवशी मला एक गोष्ट चांगली कळाली की आपण जे पेरतो तेच उगवते.आपण प्रेम वाटले तर आपल्यालाही त्याबदल्यात प्रेमच मिळणार आहे.अणि आपण जर लोकांचा तिरस्कार केला तर लोकही आपला तिरस्कारच करतील.बाकी हया जाती-पाती,धर्म हे निव्वळ माणसाने आपापसात दरी निर्माण करण्यासाठी बांधलेली एक भिंत आहे.
जी आता तोडण्याची आज खरच नितांत गरज आहे.हया जाती पाती धर्म हे केवळ माणसाने आपापसात भेद,दरी निर्माण करण्यासाठी निर्माण केलेल्या पळवाटा आहेत.जगातील कुठलाच धर्म आपापसात भांडायला,एकमेकांचे रक्त जमीनीवर सांडायला शिकवत नसतो,मुक जनावरांची निघृतपणे हत्या करायला शिकवत नाही,आपापसात वैरत्व बाळगायला शिकवत नाही.एकमेकांच्या जीवावर उठायला शिकवत नाही.मीच श्रेष्ठ इतर धर्म कमी ही भावना बाळगायला सांगत नाही.शिकवत नाही.हे सर्व माणसांनी निर्माण केलेले व्युव्ह आहेत.
शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की मजहब नही सिखाता आपस मै बैर रखना.