अशी झाली माझी फजिती
अशी झाली माझी फजिती
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी एम ए मराठीच्या पहिल्या वर्षात शिकत होतो.एकेदिवशी मी रोजप्रमाणे महाविदयालयात तासिकेला बसलेलो होतो.पण तासिकेला बसलेलो असतानाच अभियांत्रिकीला(डिप्लोमाला) माझ्या सोबत शिकावयास असलेल्या माझ्या एका फार जुन्या मित्राचा फोन आला योगेश सुर्यवंशी नाव त्याचे.ज्याला आम्ही सगळे मित्र तलाठी तलाठी म्हणायचो.आमचा पुर्ण वर्ग त्याला तलाठी हया नावानेच ओळखायचा.कारण आम्ही सोबत जेव्हा डिप्लोमाला होतो तेव्हा त्याचे वडील त्यांच्या गावचे तलाठी होते.म्हणुन आम्ही सगळे जण त्याला तलाठीच म्हणायचो.अणि तो ही त्याचा काही राग मानायचा नाही.कारण आमचा पुर्ण वर्गच तसाच होता.आम्ही सगळे एकमेकाला वडिलांच्या नावाने किंवा व्यवसायाने हाक मारायचो.म्हणुन जसे मी त्याला तलाठी म्हणायचो तसा तो ही मला हेड पोस्टमन म्हणायचा.कारण माझे वडील तेव्हा डाक खात्यात हेड पोस्टमन होते.
तो मला म्हणाला की मी म.स.गा महाविदयालयाच्या फाटकाजवळ उभा आहे येतो का?मी म्हणालो का?काही काम आहे का महत्वाचे?त्यावर तो म्हणाला हो आपल्याला आत्ता लगेच बाहेरगावी जायचे आहे.येतो का?मी म्हणालो आत्ता नाही येऊ शकत मी.अणि शिवाय सर्व विदयार्थ्यांना प्राध्यापक कँम्प ग्रंथालयात घेऊन जाणार आहे.अणि मी नाही गेलो तर माझे गुण कमी होतील.कारण ग्रंथालयात भेट दिली जाणार त्याचे गुण आहेत आम्हाला.त्यावर तो म्हणाला अरे आज माझी महाविदयालयात प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे.अणि सोबत आपल्या मित्रांपैकी कोणीच नाहीये चल ना.मी विचारले कुठे? तो म्हणाला धुळे.मी धुळयाच्या महाविदयालयात बी.ई च्या दुसरया वर्षाला प्रवेश घेतो आहे.
मी थोडया वेळ खुप विचार केला काय करु काय करु?ग्रंथालयात नाही गेलो तर प्राध्यापक नाराज होतील म्हणतील की याला एवढे सांगितले होते की आपल्याला ग्रंथालयात भेट दयायला जायचे आहे.तरी हा निघुन गेला.अणि त्याचा परिणाम माझ्या गुणांवर पण होऊ शकतो.पण मनात हा पण विचार आला की जर मित्रासोबत नाही गेलो तर अजुन त्याला पण राग येईल की याला एवढी विनंती केली तरी आला नाही.मी थोडया वेळ पेचातच पडलो होतो.काय करु?काय करु?हाच विचार मनात चालु होता.
मग शेवटी आस्तावुन पस्तावुन मी धुळयाला मित्रासोबतच जायचे ठरवले.पण मला काय माहित तिथे माझी फजिती होणार आहे.झाले असे की माझा मित्र योगेश सुर्यवंशी याच्याकडे दोन अँडमिशन फाँर्म होते.एक त्याचा अणि आमचा अजुन एक मित्र आहे ज्याचे नाव अभिजित भावसार असे आहे.त्याने काय केले एक फाँर्म माझ्याकडे दिला अणि मला ज्या मँडमांकडे फाँर्म तपासायला जातो त्यांना सांगायला लावले की मी अभिजितच्या काकाचा मुलगा आहे.मी पण गेलो अणि सांगितले की मी त्याच्या काकाचा मुलगा आहे.त्यांनी मग फाँर्म तपासला.पण त्यांना संशय होता की हा खोटे बोलतो आहे.म्हणुन त्यांनी फाँर्म बघितला अणि फाँर्मवर असलेल्या त्याच्या वडिलांचे नाव वाचले अणि मला विचारले सांग त्याच्या वडिलांचे नाव काय आहे ?.इथेच माझी फजिती झाली.
कारण मला काही अभिजितच्या वडिलांचे नाव माहित नव्हते.फक्त एवढेच माहित होते त्याचे नाव अभिजित भावसार आहे अणि तो सटाणा नाक्याकडे राहतो.बाकी त्याच्या वडिलांचे नाव काय आहे? ते काय करता? हे मला काहीच माहित नव्हते.मँडमांनी प्रश्न विचारताच आम्ही दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो.माझा मित्र योगेश मला खाणाखुणेमध्ये अभिजितच्या वडिलांचे नाव सांगायचा प्रयत्न करत होता.पण मला काही कळले नाही.
मग शेवटी माझ्या मित्राने योगेशनेच चालाखी केली अणि त्याने विषय बदलला.तो मँडमांना म्हणाला तुम्ही मालेगावला येणार होत्या ना तहसील कार्यालयात.तुम्ही बोलल्या होत्या तुमचे काही काम आहे.मँडमांचे पण मग लक्ष विचलित झाले अणि त्त्या म्हणाल्या अरे हो ना एवढया एक दोन दिवसात यायचेच होते.कोणी आहे का तहसीलला ओळखीचे?.त्यावर माझा मित्र म्हणाला माझे वडीलच तलाठी होते.आमच्या गावचे तलाठी होते माझे वडील.मँडम म्हणाल्या काय नाव तुझ्या गावाचे?माझा मित्र म्हणाला येसगाव चंदनपुरीच्या जवळ.अणि त्यांची तहसीलला ओळख आहे.तुम्ही वडिलांचे नाव सांगा तुमचे काम होऊन जाईल.
अशाप्रकारे बोलण्या बोलण्या मध्ये योगेशने मँडमांना अभिजितच्या वडिलांचे नाव मला विचारण्याचाच विसर पाडला.अणि मी मँडमांच्या तावडीतुन कसाबसा सुटलो.माझ्या मित्राचे वडील एकेकाळी तलाठी होते याचा मला चांगलाच फायदा झाला होता.मी मँडमांच्या तावडीतुन एकदाचा सुखरुप सुटलो.नाहीतर तेव्हा माझी काही खैर नव्हती.
मग बाहेर आल्यावर मी त्याला खुप बोललो काय यार सोबत म्हणुन घेऊन आला तु अणि अभिजितच्या काकाचा मुलगाच बनवुन टाकल मला मँडमांसमोर.बनवले तर बनवले मला आधी सांगुन तर ठेवायचे की त्याच्या वडिलांचे नाव काय आहे?तु दिले ना मला मँडमांसमोर तोंडावर पाडुन.त्यावर माझा मित्र म्हणाला अरे तुला खाणाखुणा करुन सांगत होतो.तुला समजलच नाही.मी म्हणालो तु कुठे सांगितले मला? त्यावर तो म्हणाला अरे तुला हाताने खाणखुण करत सांगत होतो वडा वडा.मी म्हणालो वडा काय भानगड आहे?अरे त्याच्या वडिलांचे नाव रमणलाल आहे ना.मग तु मला खाणाखुणा करुन वडा का सांगत होता.अरे रमणलालचा वडा आपल्या काँलेज स्टाँपला फेमस आहे ना मला वाटल त्याच्यावरुन लगेच लक्षात येईल तुझ्या त्याच्या वडिलांचे नाव.मी म्हणालो हो यार माझ्या लक्षातच आले नाही.
मग मँडमांची सही झाली अणि आँफिसात फाँर्म जमा करायला जात होतो.पण वाटेतच एक मुलगी माझ्याकडे एकदम प्रेमळ अंतकरणाने एकदम टक लावुन बघत होती.मग मी ही काही तिचे मन दुखावले नाही.मी ही तिच्याकडे एक नजर बघितले.मला वाटले कोणी ओळखीची असेल.पण काही ओळखीची न वाटल्यामुळे अणि परिचित न वाटल्याने मग मी नजर वळवुन घेतली.पण ती माझ्यावरुन नजर हटवायलाच तयार नव्हती.सारखी बघतच होती.अणि हा प्रकार घडला तेव्हा माझा मित्र फाँर्मला कागदपत्रे जोडत होता.मग कागदपत्रे जोडुन झाल्यावर त्याच्या लक्षात हा प्रकार आला की एक पाखरू सारखे आपल्या मित्राकडे नजरेची पापणी न हलवता एकटक बघु राहिले.मग तो मला म्हणाला काय झाले? मी म्हणालो कुठे काय? मग तो म्हणाला ती मुलगी तुझ्याकडे अशी का बघु राहिली?.काय केले तु तिला?नीट सांग काय झाले?मग मी म्हणालो मी काही केले नाही तिला तीच माझ्याशी हसत होती.अणि केव्हाची माझ्याकडे एकटक बघत होती.मला वाटले ओळखीची आहे.म्हणुन मी पण बघितले तिच्याकडे.पण काही ओळखीची वाटत नाही.
मग तो मला म्हणाला ठिक आहे जाऊ दे लक्ष नको देऊ तिच्याकडे.आपले काम बघ.मग कागदपत्र जमा करुन आम्ही मालेगावकडे प्रस्थान केले.वाटेतच आम्ही एका हाँटेलवर थांबलो तिथे मस्त थंडगार लस्सीचा आस्वाद घेतला.अणि तिथेच धुळयात योगेशची बहिण राहत असल्यामुळे आम्ही तिच्याकडेही गेलो.तिथे पण आमचा चांगलाच पाहुणचार करण्यात आला.मग तिथे एक दीड तास थांबुन विश्रांती घेऊन आम्ही मालेगावला परत आलो.मग शिवाजी पुतळयावर आम्ही पुन्हा चहापाणी केले.अणि मग सटाणा नाक्यावरुन योगेशला कपडे खरेदी करायचे होते.म्हणुन कपडे खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलो.मग तिथुन योगेशने मला घरी सोडले.अणि तो त्याच्या घरी येसगावला परतला.
पण धुळयाच्या महाविदयालयामध्ये मला जो अनुभव आला त्यातुन एक गोष्ट मला शिकायला मिळाली की खोटे बोलणे पण एक कला आहे.ज्याला जमते तोच बोलु शकतो.ज्याला नाही जमले तो तोंडावर पडतो.जशी माझ्यावर वेळ आली होती.म्हणुन ज्या विषयाबददल खोटे बोलायचे त्याबददल आपल्याला थोडी तरी माहिती असणे गरजेचे असते.नाहीतर तोंडावर पडायची वेळ येते.जशी माझ्यावर आली होती.