आयुष्य जगण्याचा खरा मंत्र मिळाला.

*आयुष्य जगण्याचा खरा मंत्र मिळाला.* 
 
   आज मी एम ए मराठीच्या गटावर आलो अणि माझ्याकडे
असलेले एम ए दितीय वर्ष मराठीचे विविध महाविदयालयातील प्राध्यापकांचे जेवढे तासिकांचे विडिओ होते.ते मी एम ए मराठीच्या गटावर आज सकाळीच येऊन टाकुन दिले.अणि मग त्यानंतर मी प्राध्यापिका सपणा सोनवणे हयांना व्हाँटस अँपवर संदेश पाठविला.की आदरणीय प्राध्यापिका महोदया सपणा सोनवणे सध्या माझे वर्गातील विदयार्थ्यांशी जे वादविवाद चालु आहे.जे गुंतागुंतीचे संबंध आहे.त्यामुळे माझी तरी मुळीच ईच्छा नाहीये की मी एम ए मराठीच्या गटावर कोणाला काही मदत करावी.किंवा कोणाला काही सहकार्य करावे.
    पण मनात दुसरीकडे हा पण विचार माझ्या मनात येतो आहे की माझ्या प्राध्यापिका वर्षा आहिरे अणि प्राध्यापिका सपणा सोनवणे तसेच प्राध्यापक विनोद केदारे यांना माझ्याविषयी काय वाटेल की आम्ही योगेशला एवढा चांगला मुलगा समजायचो जो प्रत्येकाला नेहमी मदत करतो.पण आता तो मतलबी झाला आहे.जो आता फक्त स्वताचाच विचार करतो आहे.ज्याला आता इतरांशी काही देणे घेणे राहिलेले नाहीये.
     म्हणुन तुम्ही सर्व प्राध्यापकांच्या मनात माझ्याविषयी जी प्रेमाची भावना आहे ती कमी होऊ नये.तुमच्या मनात माझ्याविषयी काही गैरसमज उत्पन्न होऊ नये म्हणुन मी माझ्या मनाविरूदध जाऊन एम ए मराठीच्या गटावरील सर्व विदयार्थ्यांना सर्व विषयांसाठी सर्व मदत करतो आहे.फक्त तुम्ही कृपया माझ्याविषयी मनात जो राग बाळगुन आहे तो काढुन टाका.
    यावर प्राध्यापिका सपणा सोनवणे मला म्हणाल्या अरे योगेश तुझ्याविषयी कोणालाच कसला राग नाहीये.तु उगाच मनात गैरसमज करुन घेऊ नको.सर्व प्राध्यापक किंवा विदयार्थी कोणालाच तुझ्याविषयी मनात काहीच राग नाहीये.तुच मनात विनाकारण गैरसमज बाळगून बसला आहे की सगळयांना तुझा राग आला आहे.कोणालाच तुझ्याविषयी काहीच राग नाहीये.
   अणि मग माझ्या मनात हा विचार आला की कुठेतरी प्राध्यापिका सपणा सोनवणे मला म्हणता आहे ते बरोबरच आहे.कारण मी एम ए मराठीच्या गटावर कितीदा सर्व प्राध्यापक तथा विदयार्थ्याना राग येईल असा वागलो आहे.पण कधी कोणीच मला शब्दानेही कधी दुखावले नाही किंवा जाब विचारला नाही की तुझे हे गटावर काय चालु राहिले?किंवा तु हे काय करू राहिला?प्राध्यापकांनीही नाही किंवा विदयार्थ्यांनीही नाही.कधी कोणीच मला काही बोलले आहे.उलट मीच नेहमी माझा माझा मनात गैरसमज करुन घेतो अणि रागाच्या भरात गट सोडुन निघुन जातो.मला कोणी कधी शब्दानेही कधी दुखावले नाही.
     मग प्राध्यापिका सपणा सोनवणे मला हे पण म्हणाल्या की असाच इतरांना मदत करत राहा.इतरांच्या कामी येत जा.तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.अणि मनात विनाकारण गैरसमज पाळुन बसु नको.
     अणि मग माझ्या पण मनात हा पण विचार आला की प्राध्यापिका सपणा सोनवणे मला सांगता आहे ती खरच लाखमोलाची बाब आहे.आपण जर इतरांना मदत करत राहिलो.इतरांच्या कामी आलो तर आपल्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.अणि खरे पाहायला गेले तर हा आयुष्य जगण्याचा एक खरा मंत्रच मला प्राध्यापिका सपणा सोनवणे यांनी त्याक्षणी दिला होता.
    अणि याचे जिवंत उदाहरण मी माझ्या डोळयासमोर स्वता बघितलेही होते ते म्हणजे माझ्या जुन्या प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे.ज्या नाशिक जिल्हयातील एक फार मोठया लेखिका आहेत.तसेच त्या बालसाहित्य समीक्षक म्हणुन पुर्ण नाशिक जिल्हयात प्रसिदध आहे.ज्यांना भारताच्या राष्टपतीपासुन तर मुख्यमंत्रीही नुसते नावाने ओळखतात.
    प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे हया मला प्राध्यापिका म्हणुन साहित्यविचार हा विषय शिकवायला होत्या तेव्हा त्या धुळे जिल्हयातील वेल्हाणे गावच्या सरपंच म्हणुन कार्यरत होत्या.तसेच त्यांचे पती तेव्हा मुंबई बोर्डाचे सचिव म्हणुन कार्यरत होते.म्हणुन त्यांची महाराष्टाच्या मुख्यमंत्रीपासुन,शिक्षणमंत्री तर थेट राष्टपतीपर्यत सुदधा तेव्हा ओळख होती.व त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढलेले होते.तसेच त्यांनी शरद पवार यांच्या सोबतही काढलेले फोटो मी बघितलेले होते.
   एवढे मोठे व्यक्तीमत्व माझ्या जुन्या प्राध्यापिका लेखिका विदया सुर्वे बोरसे हया होत्या.अणि एवढे मोठे व्यक्तीमत्व असलेली स्त्री माझ्या प्राध्यापिका होत्या.अणि मी त्यांचा सगळयात लाडका विदयार्थी होतो ही माझ्यासाठी तेव्हा खुप मोठी अभिमानाचीच गोष्ट होती.
     पण एवढे असुनही त्यांनी कधीच हयागोष्टीचा अभिमान बाळगला नाही.उलट मी महाविदयालयात काही दिवस गेलो नाही तर काळजीपोटी त्या मला स्वताहुन फोन करायच्या की काय झाले योगेश महाविदयालयात का येत नाहीये?तुझी तब्येत बरी नाही का?तुला काही अडचण आहे का?त्या एकदम आईच्या मायेने माझी काळजी करायच्या.
    अणि मला लिहायला पण त्यांनीच तेव्हा प्रोत्साहित केले होते.मला त्या सांगायच्या तुझ्या मनात जे येईल ते लिहुन टाकत जा.मग नंतर कोणता भाग ठेवायचा कोणता भाग काढुन टाकायचा हे ठरवत जा.अणि मी त्यांनी जे मला तेव्हा सांगितले होते तेच अजूनही करतो आहे.मी आधी मनात येईल ते लिहुन टाकतो मग कोणता भाग ठेवायचा अणि कोणता काढुन टाकायचा हे ठरवत असतो.
      अशाप्रकारे माझ्या जुन्या प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे हया माझी काळजी करायच्या.वेळप्रसंगी मला आर्थिक मदत करायला सुदधा त्या तयार राहायच्या.तसेच जो विषय मला त्या शिकवायच्याही नाही.त्या विषयाबाबद सुदधा मला मदत करायला त्या वेळप्रसंगी तयार असायच्या.
     मग मला जाणीव झाली माझ्या प्राध्यापिका सपणा सोनवणे मला जे काही बोलल्या त्यात काहीच चुक नाहीये.जो दुसरयांच्या कामी येतो त्याला देव कधीच काही कमी पडू देत नाही.कुठेतरी प्राध्यापिका सपणा सोनवणे यांनी मला ही नुसती शिकवण दिली नव्हती तर आयुष्य जगण्याचा एक मंत्रच दिला होता.
     खरच असे गुरू मिळायला भाग्य लागते जे आपल्या विदयार्थ्याला न दुखवता त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन देतात.अणि ते ही एकदम प्रेमळ शब्दांत.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.