प्रा.डाँ प्रकाश शेवाळे: एक संतविचारी माणुस
*प्रा.डाँ प्रकाश शेवाळे: एक संतविचारी माणुस*
काही दिवसांपुर्वीच मी एम ए मराठीच्या गटावर माझा एक लेख टाकला होता.त्याचे नाव होते मजहब नही सिखाता आपस मै बैर रखना.हया लेखात मी हिंदु अणि मुस्लिम यांच्यातील धार्मिक वितंडवादाविषयी चर्चात्मक विवेचन केले होते.तसेच माझे जुने सवंगडी झाकीर,आरीफ,मुदस्सीर अणि राहिल भाई शेख यांच्याविषयी मी त्या लेखात सांगितले होते.जे सध्या आत्ता सौदी अरबमध्ये वास्तव्यास आहे.कारण माझे मित्र राहिल भाई शेख तिथे हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स करु राहिले आहे.
असो मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.काही दिवसांपुर्वी जेव्हा मी माझा लेख एम ए मराठीच्या गटावर प्रकाशित केला.तेव्हा माझ्या मनात कुठेतरी भीती अणि शंका होती की मी जो हा लेख एम ए मराठीच्या गटावर प्रकाशित केला आहे.त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना तर दुखावणार नाही ना?कोणाचे मन तर दुखावणार नाही ना?मग अशावेळी काय करावा? मी गटावर प्रकाशित केलेला लेख मी राहु दयावा का तो डिलीट करावा हेच मला कळत नव्हते.कारण मनात कुठेतरी एक भीती होती की माझ्या हया समीक्षावादी लेखनामुळे कोणाच्या धार्मिक भावना तर दुखावणार नाही ना?.
अणि मग अशावेळी काय घडते हे मला काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.कारण अशावेळी एका लेखकाला समाजाकडुन एकच पारितोषिक दिले जाते ते म्हणजे त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे,त्याच्या लिहिण्यावर आक्षेप घेणे व बंदी आणने,त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचे समाजव्यव्यवस्थेकडुन आरोप केले जाणे.पण कोणी हे जाणुनच घ्यायचा प्रयत्न करत नाही की हा लेखक असे का म्हणतो आहे?त्याचा असे बोलण्यामागचा दृष्टीकोन काय आहे?कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव येत असतात.त्यावरुन तो त्याचे मत तसेच दृष्टीकोन ठरवत असतो.असो हया गोष्टी नेहमीच एका लेखकासोबत घडत आल्या आहेत.की त्याचे मत जाणुन घेता समाज त्याच्यावर आक्षेप घेतो.
मग अशावेळी अशा परिस्थितीत काय करावा? हे मला अजिबात कळत नव्हते.मग अशावेळी एक शिष्य तरी काय करणार?शेवटी आपल्या गुरूंचाच सल्ला घेणार?मी ही तेच केले.मी तत्काळ लगेच प्रा.डाँ प्रकाश शेवाळे जे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात नवीनच प्राध्यापक म्हणुन रूजू झाले आहेत.व त्यांच्याशी माझे चांगले मैत्रीपुर्ण संबंध आहे.त्यांना व्हाँटस अँपवर संदेश पाठविला की प्राध्यापक महोदय मी नुकताच थोडयावेळपुर्वी आपल्या एम ए मराठीच्या गटावर एक लेख प्रकाशित केला आहे.ज्यात मी हिंदु अणि मुस्लिम यांच्यातील धार्मिक वितंडवादाविषयी चर्चात्मक विवेचन तसेच समीक्षा केली आहे.कृपया तुम्ही तो लेख पुर्ण वाचा अणि मला सांगा की त्यात मी कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील असे काही चुकीचे वक्तव्य तर केले नाहीये ना?माझ्या लेखामुळे कोणाच्या धार्मिक भावना तर दुखावणार नाही ना?
मग त्यावर प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे यांनी मला एक फार सुंदर उत्तर दिले ते म्हणाले की लोकांच्या धार्मिक भावना हया तेव्हाच दुखावतात जेव्हा लोकांची जाण कमी पडते.आपण अशा लोकांचा विचार अजिबात करायचा नाही.
अणि ही खरीच गोष्ट आहे.कारण आपण अशा जगात राहतो जिथे सत्याचा विरोध करून त्याचे तोंड दाबले जाते व खोटयाला प्रोत्साहन देऊन त्याला पाठिंबा दिला जातो.म्हणुन आपण खरे बोलायला कधीच घाबरायचे नाही हे मला प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे हयांच्याकडुन तेव्हा शिकायला मिळाले.
मग मी प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे यांना म्हणालो की तुम्ही म्हणतात ते एकदम बरोबर आहे प्राध्यापक महोदय पण सत्य मांडले का लेखकाला समाजाचा रोष सहन करावा लागतो.वेळ पडली तर त्याच्या लिहिण्यावरही समाजाकडुन बंदी आणली जाते.पण त्या लेखकाचे मत कोणी ऐकुणच घेत नाही की तो असा का बोलतो आहे?त्याचा त्यामागचा दृष्टीकोन काय आहे?कारण कोणताही लेखक हा खोटे बोलत नसतो.जे तो समाजात घडताना पाहत असतो तेच तो लिहित असतो.पण ही गोष्ट लोक समजुनच घेत नाही अणि त्या लेखकावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करतात.मग त्याला लोकांच्या संतापाला तसेच सामाजिक बहिष्काराला पण सामोरे जावे लागते.मग त्यातुनच लेखकांच्या समाजसुधारकांच्या हत्याही केल्या जातात.ही खूपच खेदजनक गोष्ट आहे.
मग प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे मला म्हणाले की आत्ता सध्या मुल्य संभ्रमाचा काळ चालू आहे.लोक कशालाही विरोधच करतात.जग फार उथळ होत चालले आहे.आपण त्यांच्याकडे लक्ष दयायचे नाही.आपण आपले काम सातत्याने करत राहायचे.
अणि प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे मला जे काही म्हणाले ते एकदम बरोबरच आहे.जग हे आता फारच उथळ होत चालले आहे.लोक कशालाही आता विरोधच करु राहिले.म्हणुन आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष दयायचे नाही आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे.
अणि मग शेवटी शेवटी प्राध्यापक प्रकाश शेवाळे यांनी मला तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगितला.
...... ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतितपावना.....
हया अभंगाचा अर्थ असा आहे की समाज हा कोणतीही गोष्ट करा नावेच ठेवतो.मग ती चांगली असो किंवा वाईट असो.लोकांचे बोलणे ओकारी सारखे असते त्यांचा हात धरता येतो पण तोंड नाही धरता येत.म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे करावे लोकांना घाबरण्याचे काहीच कारण नाही.
प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे यांच्याशी माझा जो व्हाँटस अँपवर संवाद झाला यावरुन मला हे नक्कीच कळुन गेले की आमचे प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे हे एक संतविचारी माणुस आहे.जे संतांच्या विचारांवर चालणारे विचारवंत आहेत.अणि अशी व्यक्ती कधीच व्याभीचाराच्या,कुकर्माच्या,वाईट व्यसनांच्या आहारी जात नसते.जी व्यक्ती नेहमी संतांच्या विचारांचे पालन करते.त्यांच्या दाखवलेल्या विचारांवर चालते.
अणि असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे आमचे आदरणीय प्राध्यापक डाँ प्रकाश शेवाळे.जे एक संतविचारी माणुस आहेत.