मित्र असावा तर असा


     प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या आयुष्यात एक श्रीकृष्णासारखा योग्य ते मार्गदर्शन करणारा दिशा  दाखवणारा किंवा कर्णासारखा आपली चुक असतानाही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक जिवलग मित्र असावा.अणि तो असलाच पाहिजे कारण ज्या गोष्टी आपण आपल्या आईवडिलांशी,भावंडांशी शेअर करायला संकोच बाळगतो त्याच गोष्टी आपण आपल्या जिवलग मित्राशी निःसंकोचपणे शेअर करत असतो. म्हणून असे म्हटले जाते की हया जगात मैत्रीचे नाते हे इतर सर्व नात्यांपेक्षा फार घनिष्ठ नाते आहे.
     आयुष्यात एक योग्य ती दिशा दाखवणारा अणि मार्गदर्शन करणारा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हा असायलाच हवा. जेणेकरुन आपण आयुष्यात कठिन प्रसंगी खचून जात नाही निराश होत नाही.कारण आपल्याला धीर देणारा एक हक्काचा व्यक्ती आपल्याजवळ असतो.तो म्हणजे आपला जिवलग मित्र.
     एकदा काय झाले की माझ्या दोघे मोठया भावांचे घरात कडाक्याचे भांडण झाले.अणि घरात विनाकारण वाद होऊ नये म्हणून मी त्यांचे भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करावयास गेलो तर त्यात माझ्या दोन नंबरच्या मोठया भावाने रागारागात माझ्यावरच हात उचलला.त्याने मला मारले नाही पण माझी काही चुक नसताना माझ्यावर हात उचलला मला हया गोष्टीचे फार वाईट वाटले.त्याच रागात मी सकाळी ८ वाजता कोणाला न सांगता बाहेर निघून गेलो.अणि रात्री दहा वाजेपर्यत घरात आलोच नाही.सकाळपासुन घरातून गेला आहे तरी संध्याकाळ झाली तरी अजुन घरी कसा आला नाही म्हणून माझी शोधाशोध सुरू झाली.
       अणि मग आईने माझे जिवलग मित्र हर्षल अणि निखिल हया दोघांना फोन करुन विचारपूस केली की योगेश तुमच्याकडे आला आहे का? त्याचा तुम्हाला काही फोन आला होता का ? तो कुठे असेल काही सांगु शकता का?आईने अशी विचारपूस करण्यासाठी फोन केला म्हणून माझा जिवलग मित्र हर्षु याला माझी फार काळजी वाटू लागली अणि तो त्याचे काम अर्धवट सोडून दयाने हुन पायीच माझ्या घरी येण्यास निघाला.येता येता तो पुर्ण घामोघाम झाला होता कारण तो फार घाईघाईने माझ्याघरी पायीच आला होता.अक्षरश तो घरी आला तर तो पूर्ण दमोदम झाला धापा टाकत होता.मग माझ्या घरच्यांनी त्याला शांत खुर्चीवर बसवले आणि पाणी दिले.मग त्याने विचारले काय झाले आई  योगी कुठे आहे अणि केव्हापासून घरातुन गेला आहे.(तो मला लाडाने योगी म्हणायचा)
       हर्षु याला आई नसल्यामुळे तो माझ्या आईमध्येच त्याच्या आईला बघायचा.अणि माझ्या आईला त्याच्या आईचाच दर्जा द्यायचा.माझे काही चुकले तर मला चांगला खडसावायचा पण माझी काही चुक नसताना घरचे मला काही बोलले तर माझ्यासाठी तो माझ्या आईशीसुदधा  भांडायचा.मग हर्षल घरी आला त्याने माझ्याविषयी विचारपूस केली अणि मला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मग मी रात्री दहा वाजता घरी आलो तर आई मला तेव्हा काहीच बोलली नाही भाऊ पण मला काहीच बोलले नाही कारण मी दिवसभर बाहेर असल्यामुळे मला भुक  असेल म्हणून त्यांनी मला  काहीच न बोलता जेवायला बस म्हणाले अणि मला जेवायला वाढले.मग थोडया वेळाने मी शांत झोपून गेलो.
     सकाळी आठ वाजता मला हर्षुचा फोन आला.व तो मला म्हणाला योगी आज मला कामाला सुटटी आहे.आज भेटायच का? मी म्हणालो हो चालेल दहा वाजता म. स. गा महाविद्यालयाच्या पटांगणात भेटु.मग मी हर्षुला भेटायला पटांगणात गेलो तर हर्षु माझ्यावर फार चिडलेला होता.कारण मी काल जे वागलो होतो ते त्याला अजिबात पटलेले नव्हते.त्याने मला खुप सुनावले.तो मला बोलला की तुला जर घरात नव्हते थांबायचे मग तू माझ्याकडे माझ्या कामावर यायच ना.असे कोणाला न सांगता कशाला बाहेर निघून गेला.त्यावर मी त्याला म्हणालो तु तुझ्या कामाच्या वैतागात राहतो त्यात मी तुला येऊन त्रास दयायला मला योग्य नाही वाटले.त्यावर तो अजुन चिडला अणि म्हणाला की ते कामाच कारण सांगु नको मला.इथुनपुढे तुला काहीही अडचण असली मला येऊन सांगायच किंवा माझ्या कामावर येऊन लागायचे.न सांगता असे कुठे पण जायचे नाही अणि मी स्वत डिप्रेशन मधुन गेलो आहे त्यामुळे मला माहीत आहे डिप्रेशन मध्ये गेल्यावर काय होते ते.म्हणुन इथुन पुढे काही पण प्राँब्लेम असला तर आधी तु मला सांगायच.अणि कामाच काय एक गेले तर दुसरे भेटुन जाईल.काम महत्त्वाचे नाही आधी माणुस महत्वाचा आहे म्हणून इथुन पुढे पुन्हा असे काही करु नको.
        अशाप्रकारे त्याने मला आधी कडक शब्दांत अणि नंतर प्रेमळ भाषेत मार्गदर्शन केले.योग्य ती दिशा दाखवली अणि माझी चुक माझ्या लक्षात आणुन दिली.अणि सांगितले की अशा छोट्या छोट्या गोष्टी मनावर लावुन नाही घ्यायच्या.
      आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशाच एका चांगल्या मार्गदर्शन करणाऱ्या आणि योग्य ती दिशा दाखवणारया मित्राची आवश्यकता ही नेहमी असते. जो आपल्याला समजून घेतो अणि योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करतो.
         म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असावा तर असा.
                                 लेखक :योगेश सोनवणे 
                              (लेखक एम.ए मराठीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे).
     
         
      
      
   

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.