कधी कधी हरण्यात पण एक वेगळीच मज्जा असते.


         ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी नुकताच डिप्लोमा इंजिनीअरिंगमध्ये डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालो होतो.अणि त्याच्या काहीच महिन्यात वर्तमानपत्रात एक जाहीरात वाचली की इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या बेसवर जागा निघाल्या आहेत त्या सर्व जागा आयटीया काँलेजमधल्या होत्या.
         माझी शैक्षणिक पात्रता जी होती तिच्या आधारावर मी दोन पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र होतो.पहिली जागा होती प्राचार्य पदाची अणि दुसरी जागा व्याख्याता पदासाठी.माझी त्या क्षणी जाँबसाठी इंटरव्ह्यू देण्याची अजिबात ईच्छा नव्हती कारण तेव्हा मी नुकतेच बीए च्या दुसर्‍या वर्षात दाखला घेतलेला होता अणि मला मराठी साहित्याची खुप मनापासून आवड असल्यामुळे ते सोडून दुसरे काही करावे अशी माझी अजिबात ईच्छा नव्हती.अणि मला एक गोष्ट चांगली माहिती होती की माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर माझी व्याख्याता पदासाठी हमखास निवड होऊन जाणार याची मला खात्री पण होती आणि मग व्याख्याता पदासाठी माझी निवड जर झालीच तर मला माझे बीए च्या पुढचे शिक्षण रेग्युलर काँलेज करुन करता येणार नाही मनात ही पण एक भीती होती.
              अणि त्यात घरचे ऐकायला तयारच नव्हते ते सांगायचे अरे आलीच आहे घरबसल्या संधी चालून तर प्रयत्न करायला काय हरकत आहे.अणि ते पण त्यांच्या जागी बरोबर होते कारण आजकाल कोणाला लवकर नोकरी मिळत नाही अणि मला घरबसल्या संधी चालून आली होती अणि ती नाकारणे पण योग्य नव्हते.मग मी इंटरव्ह्यू दयायला जायच हे नक्की ठरल.मग कोणत्या पदासाठी अर्ज करायचा हा पण एक मोठा प्रश्नच होता.मग एकदाच मन घटट केल अणि प्राचार्य पदासाठी अर्ज करायचे ठरवले.खरे तर घरचे व्याख्याता पदासाठी अर्ज करायला सांगत होते कारण व्याख्याता पदासाठी चार ते पाच जागा होत्या आणि प्राचार्य पदाची एकच जागा होती म्हणून घरच्यांचे म्हणने होते की व्याख्याता पदासाठी अर्ज कर म्हणजे त्याच्या जागा जास्त असल्यामुळे निवड होण्याची जास्त शक्यता राहिल.घरच्यांचे म्हणने पण एकदम बरोबरच होते.पण त्याचवेळी मला माझा जिवलग मित्र तक्षिलेश याचे बोल आठवले ज्याचे वडील तेव्हा स्वता एका शाळेचे मुख्याध्यापक होते.आणि सध्या आतासुदधा ते शाळेत मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहे.तक्षिलेश हा माझा त्यावेळीचा फार जिवलग मित्र होता.
             अणि तक्षिलेश हा आम्ही जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा राहुनराहुन मला कोणत्याही अशक्य गोष्टीच्या बाबतीत एकच शब्द सांगायचा माना की अंधेरा घना है मगर दिया जलाना कहाँ मना है त्याचे ते शब्द मला त्यावेळी आठवले अणि मी एकदाचे निश्चित करुन टाकले की की प्राचार्य पदासाठीच अर्ज करणार मग भलेही माझी निवड झाली किंवा नाही झाली तरी चालेल पण अनुभव तर मिळेल.
           मग ठरल्या वेळी मी इंटरव्ह्यूला जाण्यासाठी निघालो अणि ठिक दहा वाजता मी इंटरव्ह्यूच्या ठिकाणी  पोहचलो.तिथे गेल्यावर आम्हाला आधी लेखी परीक्षा दयावी लागणार होती आणि मग त्यानंतर आमचा इंटरव्ह्यू होणार होता.पण मी गेलो तेव्हा तिथे इंटरव्ह्यू साठी कोणी येण्याची सुरुवात पण झालेली नव्हती.मी तिथे गेल्यानंतर अर्धा तासानंतर एक व्यक्ती माझ्या  शेजारी येऊन बसला मी खूप वेळ तिथे एकटा बसुन फार कंटाळलो होतो म्हणून मी त्या व्यक्तीशी गप्पा मारायला सुरवात केली मग त्यांनीही विचारले तुम्ही कुठले?अणि कोणत्या पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले आहे ते मला जे आहो जाहो करत होते त्याबाबत मला फार ओशाळल्या सारखे वाटत होते कारण ते माझ्या पेक्षा वयाने मोठे दिसत होते.अणि इतकी मोठी व्यक्ती मला आहो जाहो करू राहिली त्याच बाबतीत थोडे ओशाळल्या सारखे वाटत होते.पण तो आदरातिथ्य थोडयाच वेळासाठी होता.कारण जेव्हा मी त्यांना सांगितले की मी प्राचार्य पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो आहे.तेव्हा त्यांनी दोन मिनिटे माझ्याकडे खालून वर एकटक बघितले आणि ते मला म्हणाले अरे तु व्याख्याता पदासाठी अर्ज कर तिथे तुझी निवड कदाचित होऊ शकते.पण प्राचार्य पदासाठी तुझी निवड होण्याची शक्यता फार कमी आहे कारण तु वयात बसत नाही.दिसायला पण तु फार लहान दिसतोस.पण मी त्यांचे काही ऐकले नाही मग त्यांनी माझ्याकडे थोडया वेळ एकटक खुन्नसने बघितले अणि तणक्यात उठुन तिथुन निघून गेले.मी थोडा वेळ शाँकच झालो की यांना अचानक काय झाले पण जेव्हा आमची लेखी परीक्षा सुरू झाली अणि वर्गात एक मॅडम आल्या अणि त्यांनी घोषणा केली की प्राचार्य पदासाठी कोणी कोणी अर्ज केला आहे आहे तेव्हा ते सर पण उठले जे माझ्याकडे खुन्नसने बघुन माझ्याजवळुन उठुन गेले होते.
             मग माझी डोक्याची ट्युब लाईट पेटली अणि कळले की ते माझ्याकडे खुन्नसमध्ये का बघत होते? मग आमची सर्वांची लेखी परीक्षा झाली अणि थोड्याच वेळात इंटरव्ह्यू साठी आम्हाला सर्वाना एकएक करुन केबिनमध्ये बोलविण्यात आले.जशी जशी माझी इंटरव्ह्यू साठी केबिनमध्ये जाण्याची वेळ जवळ येत होती तसतसे माझी भीती आणखीनच वाढत होती सोप्या अणि सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर त्यावेळी माझे पुर्ण लाईट लागले होते.कारण ती माझ्या आयुष्यात पहिली  इंटरव्ह्यू होती अणि मग थोड्याच वेळात मला केबिनमध्ये बोलविण्यात आले अणि मी केबिनमध्ये प्रवेश करताच सगळे इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेले वरिष्ठ माझ्याकडे खालून वर एकटक बघायला लागले.मला सगळे कळाले की ते माझ्याकडे एकटक का बघत होते कारण मी फार लहान दिसत होतो अणि त्यांना थोड्यावेळासाठी तर असे वाटले होते की कोणी लहान मुलगाच चुकुन केबिनमध्ये घुसून आलेला आहे म्हणून मी मध्ये प्रवेश करताच ते सर्व मला विचारायला लागले कोण तु अणि मध्ये कसा आला पण जेव्हा मी त्यांना सांगितले की मी इंटरव्ह्यू साठी आलो आहे तेव्हा मग त्यांनी मला खुर्चीवर बसायला लावले आणि माझे कागदपत्र बघितले अणि जो प्रश्नांचा भडीमार सुरू केला की  मी थोडा वेळ गोंधळूनच गेलो एकाने प्रश्न विचारला अणि त्याचे उत्तर दयायचा प्रयत्न करायला लागलो तर लगेच दुसरा व्यक्ती प्रश्न विचारण्यास सुरुवात करायचा ह्यामुळे मी थोडा गोंधळुनच गेलो पण हळुहळू मी सगळयांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.अणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर निघायला लागलो तेव्हा त्यांच्यातले एक सर मला म्हणाले की बेटा तु अजुन फार लहान आहे प्राचार्य पदासाठी तुझे वय नाही बसत तु एक दोन वर्षानंतर पुन्हा प्रयत्न कर.तु अजुन फ्रेशर्स आहे.
            अणि मग मी केबिनच्या बाहेर निघालो अणि बाहेर जाऊन बसलो.थोडयाच वेळात सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले अणि सगळे घरी जाण्यासाठी निघाले तेव्हाच मी त्या सरांना बघितले जे प्राचार्य पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले होते आणि मी पण त्याच इंटरव्ह्यू साठी आलो आहे हे कळल्यावर माझ्याकडे खुन्नसने बघून माझ्याजवळुन उठुन गेले होते.त्यांना मी आँफीसच्या बाहेर एका जणाशी बोलताना बघितले की काय असेल ते आपण भरुन देऊ पण आपल काम फिक्स करुन टाका.मला कळून चुकले की हा भाऊ आता पैसे भरून लागुन जाणार. अणि मग हे सगळे बघितल्यानंतर मी माझा माझा घराच्या रस्त्याला लागलो.
             मला माहित होते की मी रिजेक्ट झालो आहे पण त्या इंटरव्ह्यू मध्ये मला खुप काही शिकायला मिळाले होते,अनुभव मिळाले होते इंटरव्ह्यू कशी घेतली जाते कशी दिली जाते अणि मुख्यत करुन पद मिळवण्यासाठी कसे पैसे फेकुन काम करुन घेतले जाते हे पण पाहायला मिळाले होते. म्हणजेच भ्रष्टाचार कसा केला जातो आहे हे अनुभवण्यास मिळाले.थोडक्यात सांगायचे म्हटले तर मला त्या इंटरव्ह्यू मध्ये खुप काही शिकायला मिळाले.
           अणि मग मनातल्या मनात एक विचार आला की कधी कधी हरण्यात पण एक वेगळीच मज्जा असते.
                                    


Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.